हिंगोलीत घर कुलूपबंद पाहून चोरट्यांचा डल्ला:वरुड समंद गावामध्ये घर फोडून 2 लाखांचा ऐवज पळविला, नर्सी नामदेव पोलिसांकडून घटनास्थळी पाहणी

0
whatsapp-image-2026-05-15-at-84528-am_1778817917.jpeg




सेनगाव तालुक्यातील वरुड समंद येथे गावात विवाह सोहळ्यासाठी गेलेल्या गावकऱ्याचे घर फोडून चोरट्यांनी सुमारे 2 लाख रुपयांचा मुद्देमाल पळविल्याची घटना घडली आहे. नर्सी नामदेव पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. या प्रकरणी अद्यापपर्यंत गुन्हा दाखल झाला नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनगाव तालुक्यातील वरुड समंद गावामध्ये गुरुवारी ता. 14 सायंकाळी विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. गावातच विवाह सोहळा असल्याने गावकरी गजानन पवार हे सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घराला कुलुप लाऊन कुटुंबियांसह विवाह सोहळ्यासाठी गेले होते. घराला कुलुप असल्याचा गैरफायदा घेत चोरट्यांनी घराचे कुलुप तोडून आत प्रवेश केला. यावेळी चोरट्यांनी घरातील काही साहित्याची नासधुस केली. त्यानंतर घरात ठेवलेले दागिने व रोख रक्कम असा सुमारे २लाख रुपयांचा मुद्देमाल पळविला. दरम्यान, रात्रीसाडेसात वाजता रात्री साडेसात वाजता पवार कुटुंब परत आल्यानंतर त्यांना घराचे कुलुप तुटलेले दिसले. त्यांनी तातडीने घरात जाऊन पाहणी केली असता घरातील काही साहित्य अस्ताव्यस्त दिसून आले शिवाय घरातील कपाट उघडे दिसले. त्यांनी कपाटात पाहणी केली असता त्यातील रोख रक्कम व दागिने पळविण्यात आल्याचे दिसून आले. घरात चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने नर्सी नामदेव पोलिसांशी संपर्क साधला. या घटनेची माहिती मिळताच नर्सी नामदेव पोलिस ठाण्याचे सहाय्क पोलिस निरीक्षक अशोक घारगे, जमादार खंडेराव नरोटे यांच्यासह पोलिस पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी श्‍वान पथकालाच पाचारण केले होते. मात्र श्‍वान पथक चोरट्यांचा माग काढू शकले नाही. तर ठसे तज्ञांनी घटनास्थळावरून काही ठसे नमुन घेतल्याचे सुत्रांनी सांगितले. या प्रकरणी अद्यापपर्यंत नर्सी नामदेव पोलिस ठाण्यात नोंद झाली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed