11वर्षापूर्वी सोलापुरात भूमिपूजन केलेले उड्डाणपूल का झाले नाहीत?- दिव्य मराठी:गडकरी- मनपा आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांनी जागाच दिली नाही; तर काय हवेत उड्डाणपूल

0
new-project-2026-05-15t100653042_1778819866.jpg




सोलापुरात छत्रपती संभाजी महाराज चौक ते पत्रकार भवन आणि जुना बोरामणी नाका ते पत्रकार भवन हे दोन उड्डाणपूल प्रस्तावित आहेत. मात्र भूमिपूजन होऊन 11 वर्षे लोटली तरी काम सुरू झालेले नाही. मोहोळ ते वळसंग हा 740 कोटींचा नवीन महामार्ग बांधण्यात येत आहे. त्यासाठी खासदार प्रणिती शिदे, आमदार सुभाष देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यात श्रेयाची लढाई सुरू आहे… सोलापूर ते पुणे चारऐवजी सहापदरी रस्ता होणार का? सुरत ते चेन्नई रस्त्याचे काम बंद आहे… यासह सोलापुरातील अनेक प्रश्नांबाबत दिव्य मराठीने केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना बोलते केले. संत ज्ञानेश्वर पालखी मार्गाच्या पाहणीदरम्यान त्यांच्याशी झालेला संवाद…
Q. सोलापूर शहरातील दोन उड्डाणपुलाचे भूमिपूजन 11 वर्षापूर्वी आपण केले. त्या रस्त्याचे काम अद्याप सुरू नाही… A. “जर महापालिका आणि जिल्हाधिकाऱ्यांनी जागाच उपलब्ध करून दिली नाही, तर मी काय हवेत उड्डाणपूल बांधणार का (संताप व्यक्त करत)? उड्डाणपूल झाले नाहीत, यास पालिका आयुक्त व जिल्हाधिकारी जबाबदार आहेत. उड्डाणपूल का झाले नाही त्यांना विचारा… Q. मग उड्डाणपूल होणार की नाही, आपण जाब विचारणार काय? A. मध्यंतरी या कामास पुन्हा मंजुरी दिली होती. आता पुन्हा मंजुरी दिली आहे. मात्र, अद्यापही भूसंपादनाचा पेच कायम आहे. जागा ताब्यात मिळाल्याशिवाय काम पुढे नेणे अशक्य आहे. याबाबत दोन वेळा मुदतवाढ दिली. आता शेवटची संधी आहे. Q. 740 कोटींच्या मोहोळ-वळसंग रस्त्याच्या कामाला तुम्ही मंजूरी दिली. पण काँग्रेस व भाजपात श्रेयवाद रंगला आहे. हे श्रेय कोणाला देता? A. ज्यांनी मला पत्र दिले त्यांना मी उत्तर देतो. या फालतू लफड्यांत पडण्याचे माझे काम नाही. विकासकामे करणे हे माझे उद्दिष्ट आहे. श्रेय कोणाला घ्यायचे, त्यांनी खुशाल घ्यावे. मी काम करणारा माणूस आहे. मला काम महत्वाचे आहे. Q. सोलापूर ते पुणे सहापदरी रस्ता करावा अशी मागणी आहे… A. मागणी असली तरी दोन पदरी सर्व्हिस रोड करण्यात येणार आहे. त्याचे काम सुरू आहे. Q. सुरत ते चेन्नई कॅरिडॉरचे काम थांबले A. मध्यंतरी अडचणीमुळे ते काम थांबले. आता पुन्हा सुरू करण्यात येत आहे. सोलापुरात नवीन मार्ग होत असल्याने पुणे व मुंबईतील वाहतूक कमी होईल. दक्षिण व उत्तर भारतास जोडणारा रस्ता सोलापुरातून जाईल.‎‎‎‎

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *