Students of Gyan Sadhana Gurukul excel in 10th class results, more than 30 students scored more than 80 percent marks

0
253_17786750856a046d8d3c6c6_33965368098.jpg



ज्ञानसाधना बहुउद्देशीय व सेवाभावी संस्था, केडगाव संचलित ज्ञानसाधना गुरुकुल क्लासेस यांनी यंदाही दहावीच्या परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. यामध्ये दिया कुलट हिने ९५ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. प्रथमेश गारुडकर याने ९१ टक्

.

याशिवाय हर्षदा दळवी (९०.४०), अक्षरा पानसंबळ (९०), आदित्य शिर्के (९०), अदिती कोठावळे (९०), आयुष राऊत (८९), दिव्या रोकडे (८८), साक्षी कसबे (८६), श्रावणी कोळी (८६), आकांक्षा चिपाडे (८५), वर्षा शिंदे (८४), रुचिका पाटोळे (८४), अनुष्का राऊत (८३), संस्कृती गावडे (८२), अर्पिता टिमकरे (८२), श्रेयस शेलार (८२), शार्दुल धामणे (८२), सिद्धांत नरवडे (८२), अक्षरा घोडके (८१), रुद्र गाडीलकर (८१), श्रेयस शिंगोटे (८१), सार्थक देवकर (८०), कृष्णा देशमुख (८०), अमृता येळकर (८०), श्रावणी मतकर (८०), सर्वेश अंधारे (८०), हर्ष मोहीम (८०) यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार ज्ञानसाधना गुरुकुल तसेच केडगाव ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना संस्थेचे संचालक प्रसाद जमदाडे म्हणाले, ज्ञानसाधना गुरुकुलने १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली असून येथील विद्यार्थी दरवर्षी उत्तम यश संपादन करत आहेत. पालकांनी मुलांना दर्जेदार शिक्षण द्यावे. ‘लेक वाचवा, लेक शिकवा’ हा संदेश समाजात रुजविणे आवश्‍यक आहे. यावेळी प्रतिक्षा फुलारी, पूर्वा ढोरसकर व नक्षत्रा ढोरसकर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed