भोंदू गुरुमाऊलीच्या पोलिस कोठडीत वाढ:100 सिमेंटच्या कासवांचे गौडबंगाल, 16 मे पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे न्यायलयाचे आदेश
![]()
पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक व अघोरी प्रतिबंधक कायद्याखाली अटकेत असलेल्या आढेगांव येथील भोंदूबाबा गुरूमाऊली उर्फ पांडुरंग विरकर व त्याचा भाऊ विकास विरकर यांना पाच दिवसांच्या पोलिस कोठडीनंतर माढा न्यायालयात हजर केले असता पुढील तपासासाठी १६ तारखेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायाधीश कुलकर्णी यांनी दिले. माढा तालुक्यातील आढेगांव येथील भोंदूबाबा गुरूमाऊली उर्फ पांडुरंग विरकर व त्याचा भाऊ विकास विरकर यांच्यावर आर्थिक फसवणूक,अघोरी कृत्य प्रतिबंधक कायदा व वन्यजीव संरक्षण कायद्या अंतर्गत टेंभूर्णी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी माढा न्यायालयाने १३ मे पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते.पाच दिवसांच्या पोलिस कोठडी नंतर त्यांना बुधवार दि १३ रोजी माढा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना १६ मे पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.सरकारी पक्षाच्या वतीने पुनम देशमुख तर आरोपींच्या वतीने अॅड. शिंदे व अॅड. अहिवळे यांनी काम पाहिले. तक्रार दाखल करण्यास फिर्यादिने दोन वर्षांचा उशीर केला आहे.कायदेशीर प्रक्रिया न राबवता आरोपींना अटक करण्यात आली आहे.फिर्यादीने स्वतः कंपनीचे रजिस्ट्रेशन करून त्यासाठी लागणारी फि शासनाकडे जमा केली आहे.या संबंधी आरोपींचा काहीही संबंध नाही.घरामध्ये कासवांची प्रतिकृती ठेवणे हा गुन्हा नसून सरकारने कासवांच्या प्रतिकृतींवर आळा घातलेला नाही.तसेच कासवा संबंधी कोणत्याही प्रकारची तक्रार दाखल नाही.फिर्यादीने ऑनलाईन रक्कम दिली असेल तर त्याची मागणी करण्या करीता नोटिस पाठवलेली नाही.पाच दिवसांच्या पोलीस तपासात काहीही निष्पन्न झाले नसून हा दावा केवळ त्रास देणे व बदनामी करण्याच्या उद्देशाने दाखल करण्यात आला आहे त्यामुळे दोघांनाही न्यायालयीन कोठडी देण्यात यावी.
