खासदार रामराव वडकुते ई-बाईकवरून पोहोचले जिल्हाधिकारी कार्यालयात:म्हणाले – भविष्यासाठी पर्यावरणपूरक पर्याय स्वीकारणे आवश्यक

0
new-project-2026-05-14t155543937_1778754405.jpg




इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे राज्यसभा सदस्य रामराव वडकुते यांनी गुरुवारी ता. १४ दुपारी ई बाईकवरून प्रवास केला. त्यांनी बाईकवरूनच जिल्हाधिकारी कार्यालया गाठले. त्यानंतर तेथे जिल्ह्यातील विकास कामांसोबतच कायदा व सुव्यवस्थेवरही अधिकाऱ्यांशी चर्चा केली. पुढील काळात ई-कार घेऊनच प्रवास करणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. देशात पेट्रोल-डिझेल टंचाईची परिस्थिती निर्माण होत असताना पर्यावरणपूरक आणि पर्यायी वाहतुकीचा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. इंधन वाचविण्याचे आवाहन त्यांनी नुकतेच केले आहे. त्यांनी यांनी केलेल्या पर्यावरणपूरक वाहतुकीच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून भाजपाचे राज्यसभा सदस्य रामराव वडकुते यांनी त्यांची कार बाजूला ठेऊन ई बाईकने प्रवास केला. सकाळपासून त्यांनी कार्यकर्त्यांच्या घरी भेटी देतांना बाईकचाच वापर केला. त्यानंतर दुपारी ते जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या सोबत जिल्ह्यातील विकास कामांवर चर्चा केली. आगामी काळात विकास कामांसाठी लागणारा निधी तसेच नवीन प्रकल्प याविषयावर चर्चा केली. त्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले. त्यानंतर त्यांनी पोलिस अधिक्षक निलाभ रोहन यांच्याशी जिल्हयातील कायद व सुव्यवस्थेवर चर्चा केली. यावेळी बोलताना खासदार वडकुते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशहितासाठी दिलेल्या सूचनांचे पालन करणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. इंधन बचत आणि पर्यावरण संरक्षणासाठी ई-वाहनांचा वापर वाढणे काळाची गरज आहे. आपण स्वतः ई बाईकवरच शहरांमध्ये फिरणार असून, उन्हाळा असला तरी ई-बाईकचाच वापर करणार आहे. तर पुढील काळात ई कारही घेणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. देशाच्या भविष्यासाठी पर्यावरणपूरक पर्याय स्वीकारणे आवश्यक आहे. आपण लोकांना जे सांगतो, ते स्वतःही आचरणात आणले पाहिजे. हिंगोली शहरात खासदार वडकुते यांनी ई-बाईकवरून जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचत नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. पेट्रोल-डिझेल टंचाईच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या उपक्रमाची शहरात चर्चा रंगली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed