फडणवीसांची बाईकवरून एन्ट्री, पण PUC ची मुदत संपलेली:वर्षा गायकवाड यांनी कागदपत्रे आणली समोर, भाजपकडूनही खुलासा
![]()
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी स्वतः केवळ दोन गाड्यांचा ताफा घेऊन प्रवास करत इंधन बचतीचा वस्तुपाठ घालून दिला होता. याला प्रतिसाद देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनीही आज दुचाकीवरून विधानभवन गाठले. मात्र मुख्यमंत्री ज्या दुचाकीवरून आले, त्या दुचाकीची पीयूसी संपलेली असल्याची टीका काँग्रेसने केली आहे. खासदार वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भातील कागदपत्रे समोर आणली आहे. तर काँग्रेसच्या या टीकेवर भाजपकडून खुलासा करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज स्वतः ‘रॉयल एनफिल्ड ३५०’ ही दुचाकी चालवत विधानभवनात दाखल झाले. विशेष म्हणजे, त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेला ताफादेखील यावेळी आलिशान गाड्यांऐवजी दुचाकीवरूनच प्रवास करताना दिसला. मुख्यमंत्र्यांच्या या अनोख्या एन्ट्रीची विधानभवन परिसरात मोठी चर्चा झाली. मात्र, विरोधकांनी याला ‘स्टंटबाजी’ म्हणत टीका करण्यास वेळ लावला नाही. पीयूसी एक्स्पायर्डवरून काँग्रेसची टीका मुंबईतील काँग्रेस नेत्या आणि खासदार वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांच्या या एन्ट्रीतील मोठी त्रुटी शोधून काढली आहे. ज्या बुलेटवरून मुख्यमंत्री विधानभवनात आले, त्या दुचाकीचे ‘प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र’ म्हणजेच ‘पीयूसी’ची मुदत संपल्याचे कागदपत्र त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहे. वर्षा गायकवाड यांनी आपल्या ट्विटमध्ये मुख्यमंत्र्यांवर खोचक शब्दांत निशाणा साधला. काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींवर टीका करताना “राजकारणातील एक्स्पायर्ड माल” असा शब्दप्रयोग केला होता. तोच धागा पकडत वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा साधला आहे. “मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या स्टंटसाठी ज्या वाहनाची निवड केली, त्याचे पीयूसी मुदतबाह्य झालेले होते. मग आता सांगा, ‘एक्स्पायर्ड माल’ चालतो का?” असा सवाल करत, मुंबई आरटीओ आणि मुंबई ट्रॅफिक पोलिस काही कारवाई करणार का? अशी विचारणा वर्षा गायकवाड यांनी केली.
गायकवाडांच्या टीकेवर भाजपचे स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी चालवलेल्या बुलेटची पीयुसी कालबाह्य झाल्याची बाब वर्षा गायकवाड यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर आता भाजपने पलटवार केला आहे. सर्व्हर बंद असल्याने प्रमाणपत्र प्रलंबित आहे, मात्र काँग्रेस खोटं पसरवत आहे, असे उत्तर भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी दिले. नवनाथ बन म्हणाले, वर्षाताई, सदर वाहन हे पोलिस विभागाचे आहे. ते स्वतः मुख्यमंत्री महोदय चालवणार असल्याने पोलिसांनी योग्य खबरदारी आधीच घेतली होती. काल त्याची सर्व्हिसिंग सुद्धा झाली. वाहन प्रणालीवर 9 ते 18 मे पर्यंत कामकाज बंद असल्याने त्यांनी हे वाहन पर्यावरणीय दृष्ट्या सक्षम असल्याचे प्रमाणपत्र सुद्धा आधीच घेतले होते. जनतेच्या मनातून उतरलेली काँग्रेस आता कागदपत्रांमधील तांत्रिक बाबींवरून स्वस्त प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत आहे, असे म्हणत नवनाथ बन यांनी बुलेटच्या पीयुसीबाबतही खुलासा केला आहे. तसेच, वर्षाताईंनी ट्वीट करण्यापूर्वी सत्य पडताळून पाहिलं असतं, तर स्वतःचीच फजिती टळली असती, असा टोलाही त्यांनी लगावला. तर, मूळ प्रश्न आपण पंतप्रधान महोदयांच्या आवाहनाला प्रतिसाद देणार की नाही, हा आहे. त्याचे उत्तर आधी द्या, ‘तोवर इधर-उधर की बा राजकीय आरोप-प्रत्यारोप एकीकडे सत्ताधारी इंधन बचतीचा संदेश देत असल्याचे सांगत असताना, दुसरीकडे नियमांचे उल्लंघन झाल्याचा दावा करत काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. या तांत्रिक चुकीमुळे मुख्यमंत्र्यांच्या इंधन बचत मोहिमेवर टीकेची झोड उठली असून, आता गृह विभाग किंवा आरटीओ (RTO) यावर काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
