सटाण्यात रुग्णसेवा रामभरोसे; 8 पैकी 4 पदे रिक्त:रुग्णवाहिकाही नादुरूस्त, दोन डॉक्टर 18 मेपासून कार्यमुक्त होणार असल्याने दोघांवरच राहणार भार
![]()
येथील ग्रामीण रुग्णालयातवैद्यकीय अधिकाऱ्यांचीकमतरता, निधीचा तुटवडा,औषधसाठ्याचा अभाव आणिनादुरुस्त रुग्णवाहिका यांमुळेरुग्णालयाची अवस्था अत्यंतबिकट झाली आहे. तालुक्यातीलआरोग्य व्यवस्थाच सध्या‘व्हेंटिलेटर”वर असल्याचे चित्रनिर्माण झाले असून,सर
.
त्यातच १८ मे रोजी दोन डॉक्टर कार्यमुक्त होणारअसल्याने, संपूर्ण रुग्णालयाचाभार केवळ दोनच डॉक्टरांवरयेणार आहे. यामुळे रुग्णसेवेवरगंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. केवळ डॉक्टरच नव्हे, तरतांत्रिक कर्मचाऱ्यांचीही येथेवाणवा आहे. शवविच्छेदनासाठीकर्मचारी उपलब्ध नसल्यानेनातेवाइकांची मोठी गैरसोय होते.
रुग्णालयात बालकांसाठी
रुग्णालयातील ८ पैकी ४ पदेभरलेली आहेत, मात्र त्यातील दोनअधिकारी कार्यमुक्त होत आहेत.यासंदर्भात वरिष्ठ कार्यालयालाकळवले आहे. नवीन नियुक्ती नझाल्यास रुग्णसेवेवर परिणाम होऊशकतो.- डॉ. संदीप भगत,वैद्यकीय अधीक्षक
अत्यावश्यक असलेली ‘रोटाव्हायरस’लस उपलब्ध नाही. तसेच स्त्रीरोगतज्ज्ञ नसल्याने गरोदर महिलांनाखासगी रुग्णालयांचा आधार घ्यावालागतो, ज्यामुळे गरीब कुटुंबांवरआर्थिक भार पडत आहे.अपघातग्रस्तांसाठी उभारलेल्या ट्रॉमाकेअर सेंटरमध्येही पुरेशा सुविधानसल्याने जखमींना मालेगाव किंवानाशिकला हलवावे लागते. येथील १०२क्रमांकाची रुग्णवाहिका १५ वर्षे जुनीझाली असून, वारंवार नादुरुस्त होतअसल्याने तिला अनेकदा धक्कामारण्याची वेळ येते. रुग्णालयातील यागंभीर समस्यांकडे लोकप्रतिनिधी आणिवरिष्ठ आरोग्य प्रशासनाने तातडीनेलक्ष देण्याची मागणी आता जोर धरूलागली आहे.
..अन्यथा तीव्र आंदोलन प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गोरगरीबनागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीरझाला आहे. तातडीने डॉक्टरांचीनियुक्ती आणि सुविधा उपलब्ध नकेल्यास रिपब्लिकन सेनेच्या वतीनेतीव्र आंदोलन छेडले जाईल. – अमोल बच्छाव, प्रवक्ता,रिपब्लिकन सेना
निधीअभावी औषध खरेदी रखडली ग्रामीण रुग्णालयाला शासनाकडून दरवर्षी दीड लाखरुपये रुग्ण कल्याण निधी मिळतो. यातूनआणीबाणीच्या काळात लागणारी औषधे खरेदी केलीजातात. मात्र, मागील वर्षाचा निधी अद्याप प्राप्तझालेला नाही. निधीअभावी अत्यावश्यक औषधांचीखरेदी करणे प्रशासनाला कठीण झाले आहे. यामुळेगरजू रुग्णांना खासगी मेडिकलमधून महागडी औषधीखरेदी करावी लागत आहे.
वरिष्ठांना कळविले सटाणा ग्रामीण रुग्णालयाची इमारत. दुसऱ्या छायाचित्रात एक वर्षापासून ग्रामीण रुग्णालयाची भंगारात निघालेली १०२ रुग्णवाहिका .
