Girls perform better than boys in CBSE Class 12th exams
बहुतेक शाळांचा ९८ टक्क्यांवर निकाल
.

प्रतिनिधी । अमरावती
सीबीएसई १२ वीचा निकाल बुधवारी १३ मे रोजी दुपारी घोषित झाला. शहरातील विविध सीबीएसई शाळांनी त्यांची ९८ टक्क्यांवर गुणांची परंपरा यंदाही कायम राखली. टायटन स्कूलच्या शेख हातिम शेख इब्राहिम मन्सुरीने ९७.४० टक्के गुण मिळवून शाळेतून प्रथम क्रमांक मिळवला.
या शाळेचा एकूण निकालही उत्तम लागला आहे. पी.आर.पोटे पाटील इंटरनॅशनल स्कूलच्या राजेश्वरी राठोडने ९६.४० टक्के गुणांसह स्कूलमधून प्रथम तर पार्थ चांडकने ९५ टक्के गुण मिळवून दुसरा क्रमांक पटकावला. महर्षी पब्लिक स्कूलने १२ वीच्या परीक्षेत पुन्हा एकदा १०० टक्के उत्तम निकालाची परंपरा कायम राखली आहे.
स्वरांजली भेलकरने ९४.६० टक्के गुण मिळवून महर्षी पब्लिक स्कूलमधून प्रथम क्रमांक मिळवला तर प्रज्वल मानकरने ९४.४० टक्के गुणांसह दुसरा क्रमांक मिळवला. आरुषी बाफना ९४ टक्के गुण मिळवून तिसऱ्या क्रमांकावर राहिली. अभ्यासा इंग्लिश स्कूलनेही १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखण्यात यश मिळवले. प्रशिक इंगळेने ९०.१० टक्के गुणांसह शाळेतून पहिला, युगा भेंडेने ९० टक्के गुणांसह दुसरा क्रमांक पटकावला. एडिफाय स्कूलचे १०० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. अक्षत काळेने पीसीएम गटातून ९२.४ टक्के गुण मिळवून शाळेतून प्रथम क्रमांक पटकावला. शगुन श्रीवास्तव ही ९२ टक्के गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिली. अथर्व नेमानी व अद्वैय कांडलकरने यांनी ८८.८ टक्के गुण मिळवून संयुक्तपणे उर्वरित. पान ४
विद्यार्थी पालकांमध्ये पसरली आनंदाची लाट सीबीएसई १२ वीचा निकाल घोषित झाल्यानंतर विद्यार्थी व पालकांनी लगेच निकाल बघितला. यात उत्तम गुणांसह उत्तीर्ण झालेले विद्यार्थी व पालकांमध्ये आनंदाची लाट पसरली. नातेवाईकांना मोबाईलवरून आनंदाची बातमी देण्यासाठी होड लागलेली दिसली. पालक उत्तम गुणांनी उत्तीर्ण झालेल्या पाल्यांचे पेढा भरवून तोंड गोड करताना दिसले. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी एकमेकांना फोन करून किती टक्के गुण मिळाले अशी विचारणा करीत एकमेकांचे अभिनंदन केले.
