श्री बालाजी उत्सवाच्या पंगतीत 11 हजार भाविकांना महाप्रसादाचा लाभ:5 अन्नदात्यांचे अन्नदान; 12 हजार मोतीचूर लाडूंचे केले वाटप‎

0
240_17786698116a0458f36797b_undangaon1111.jpg



सिल्लोड तालुक्यातील उंडणगाव येथे श्री बालाजी उत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या पहिल्याच भव्य महाप्रसाद पंगतीला बुधवारी जनसागराचे स्वरूप प्राप्त झाले होते. ‘भक्ती तिथे शक्ती’ याचा प्रत्यय देत तब्बल ११ हजार भाविकांनी एकाच दिवशी महाप्रसादाचा

.

या सोहळ्यासाठी गाव आणि परिसरातील पाच दानशूर अन्नदात्यांनी आपला मदतीचा हात पुढे केला. यामध्ये सुनील वामन धनवई (उंडणगाव), रितेश संजय माळी (अजिंठा), रंगनाथ विश्वनाथ सपकाळ (वसई), रामेश्वर विठ्ठलराव जगताप (गोळेगाव) आणि शंकर किसन शेळके (आसडी) यांचा समावेश होता. या अन्नदात्यांच्या उदार योगदानामुळेच इतक्या मोठ्या प्रमाणावर अन्नदान करणे शक्य झाले. महाप्रसादासाठी तब्बल १८ क्विंटल कणिक, ३ क्विंटल बासमती तांदूळ आणि ३ क्विंटल तूरडाळीचा वापर करण्यात आला. मसाला भात आणि वरण-पोळीच्या या बेताने भाविकांची तृप्ती केली. या सोहळ्याचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे गावातील महिलांनी दाखवलेला विलक्षण सेवाभाव. हजारो लोकांसाठी पोळ्या बनवणे हे मोठे आव्हान होते, मात्र गावकऱ्यांनी यावर अनोखा उपाय शोधला. गावातील घराघरांतून पीठ वाटप करण्यात आले आणि गावातील प्रत्येक महिलेने श्रद्धेने स्वतःच्या घरी पोळ्या लाटून त्या उत्सवाच्या ठिकाणी आणून दिल्या असल्याचे संयोजकांनी सांगितले. श्रमादानाच्या या अनोख्या उपक्रमामुळे हा केवळ एक कार्यक्रम न राहता एक कौटुंबिक सोहळा बनला. उंडणगावचा हा बालाजी उत्सव केवळ धार्मिक विधीपुरता मर्यादित न राहता, तो सामाजिक सलोख्याचे केंद्र बनला आहे. जात-पात आणि भेदभावा पलीकडे जाऊन संपूर्ण गाव एकाच पंगतीत बसल्याने ग्रामस्थांच्या एकतेवर शिक्कामोर्तब झाले.

अजिंठ्याच्या भाविकातर्फे मोतीचूर लाडूंचे वितरण अजिंठा येथील भाविक संजय माळी यांच्या वतीने १२ हजार मोतीचूर लाडूंचे वाटप करण्यात आले. प्रसादासोबत प्रत्येकाला लाडू देण्यात येत असल्याने भाविकांच्या चेहऱ्यावर समाधान ओसंडून वाहत असल्याचे दिसून येत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed