अतिरेक्यांशी संपर्क; लातूर–नांदेड जिल्ह्यातील तीन जणांची एटीएसकडून चौकशी

0
IMG_20260513_161651.jpg


नांदेड (प्रतिनिधी)- लातूर आणि नांदेड जिल्ह्यातील तीन व्यक्तींना दहशतवादी कारवायांशी संबंधित संशयावरून महाराष्ट्र अँटी टेररिस्ट स्कॉड (एटीएस) यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानातील शहजाद भट्टी (याचे नाव अतिरेकी कार्यवायामध्ये अनेकदा आलेले आहे) या व्यक्तींशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क असल्याची प्राथमिक माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

एटीएसच्या पथकाने आज सकाळी कारवाई करत लातूर आणि नांदेड जिल्ह्यातील तिघांना चौकशीसाठी बोलावले. त्यांच्या मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक उपकरणे तसेच आर्थिक व्यवहारांची तपासणी सुरू असून, कोणत्याही अतिरेकी संघटनेशी प्रत्यक्ष संबंध आहे का याचा शोध घेतला जात आहे. सध्या तपास प्राथमिक टप्प्यात असून कोणतीही अधिकृत अटक करण्यात आलेली नाही, असे सूत्रांनी सांगितले. सुरक्षा यंत्रणांनी नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन केले आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून पुढील माहिती तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.


Post Views: 503






Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed