NEET Exam Cancellation: CEO Kukreja Demands Transparency
![]()
नीट (NEET) परीक्षा रद्द होणे ही अत्यंत दुर्दैवी बाब असून, कोणत्याही राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेसाठी पारदर्शकता आणि विश्वासार्हता अत्यंत आवश्यक आहे. अशा घटनांमुळे लाखो विद्यार्थी आणि पालकांच्या विश्वासाला तडा जातो, असे मत एलन करिअर इन्स्टिट्यूटचे सीईओ
.
परीक्षा रद्द झाल्यामुळे पुन्हा परीक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी एलन संस्था खंबीरपणे उभी असल्याचे कुकरेजा यांनी सांगितले. हा काळ विद्यार्थ्यांसाठी मानसिक आणि शैक्षणिकदृष्ट्या आव्हानात्मक आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी कोणत्याही अफवा किंवा भ्रमांना बळी न पडता पूर्ण सकारात्मकतेने आपल्या तयारीवर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन त्यांनी केले. ही वेळ निराश होण्याची नसून, स्वतःची कामगिरी सुधारण्याची एक संधी म्हणून याकडे पाहावे, असेही ते म्हणाले. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास कायम राखण्यासाठी एलन सर्व प्रकारचे शैक्षणिक सहकार्य आणि मार्गदर्शन पुरवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भविष्यात पेपरफुटी आणि इतर गैरप्रकार रोखण्यासाठी कुकरेजा यांनी तंत्रज्ञानावर आधारित प्रणाली स्वीकारण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी सुचवले की, जेईई (JEE) परीक्षेप्रमाणे नीट परीक्षा देखील ‘कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट’ (CBT) मोडमध्ये आयोजित केली जावी. यामुळे मानवी हस्तक्षेप कमी होऊन परीक्षेतील पारदर्शकता वाढेल, असे त्यांचे मत आहे.
याशिवाय, नीट परीक्षा देखील जेईईच्या धर्तीवर ‘मेन्स’ आणि ‘ॲडव्हान्स’ अशा दोन टप्प्यांत घेण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. ज्याप्रमाणे जेईई मेन वर्षातून दोनदा घेतली जाते, तशीच व्यवस्था नीटसाठी लागू केल्यास विद्यार्थ्यांवरील परीक्षेचा ताण कमी होईल आणि त्यांना आपले गुण सुधारण्याची अधिक चांगली संधी मिळेल. या बदलांमुळे खऱ्या अर्थाने पात्र आणि कष्टकरी विद्यार्थ्यांना देशातील नामवंत मेडिकल कॉलेजेसमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी एक न्याय्य व्यासपीठ उपलब्ध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
