बासमती तांदूळ-प्राण्यांसाठी खाद्यपदार्थ निर्यातीच्या बहाण्याने सव्वा चार कोटींचा गंडा:पुणे पोलिसांकडून व्यावसायिकाविरुद्ध 2 गुन्हे दाखल

0
1e0380b9-6500-4104-9837-ccf4453ac67e_1778655509830.jpg




पुण्यात निर्यातीच्या आमिषाने चार कोटी 32 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बासमती तांदूळ आणि प्राण्यांसाठी खाद्यपदार्थ निर्यात करण्याच्या बहाण्याने ही फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी मनीष रमणलाल गांधी (वय 50, रा. सोजस सार्थक अपार्टमेंट, अभिनव शाळेजवळ, एरंडवणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील एका व्यावसायिकाने याबाबत डेक्कन पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार मुंबईतील चारकोप परिसरात राहतात. आरोपी गांधी याच्याशी त्यांची ओळख झाली होती. गांधीने त्यांना बासमती तांदूळ निर्यात व्यवसायात गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवले. त्यांच्याकडून वेळोवेळी परदेशी चलन आणि भारतीय चलनातून दोन कोटी आठ लाख रुपये घेतले. पैसे घेतल्यानंतर त्यांना परतावा दिला नाही आणि पैसे परत मागितल्यावर टाळाटाळ सुरू केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर व्यावसायिकाने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिस उपनिरीक्षक एस. पवार या प्रकरणाचा तपास करत आहेत. आरोपी गांधीने अशाच पद्धतीने एका वकिलाची दोन कोटी 24 लाख रुपयांची फसवणूक केल्याचेही उघडकीस आले आहे. सहकारनगर भागात राहणाऱ्या या वकिलाने दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपीविरुद्ध डेक्कन पोलिसांनी आणखी एक गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थायलंडमधील एका कंपनीला ॲनिमल कॉर्न फूड पाठवायचे आहे, या व्यवसायात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे सांगून आरोपी गांधीने त्यांची फसवणूक केली. सहायक पोलिस निरीक्षक एन. जाधव या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *