Baramati Pawar Family Succession Politics; Third Generation Gears Up for 2029 Election

0
3-photo-6_1778561184.png



राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती मतदारसंघाच्या भविष्यातील नेतृत्वाबाबत राजकीय चर्चांना मोठी चालना मिळाली आहे. पवार कुटुंबातील पुढचा राजकीय वारसदार कोण, याबाबत आता विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. विशेष म्हणजे पवार घराण्

.

एकीकडे खासदार सुप्रिया सुळे आणि कुटुंबातील काही सदस्य सार्वजनिकरित्या पवार विरुद्ध पवार, होणार नसल्याचे सांगत असले, तरी प्रत्यक्षात मतदारसंघात सुरू असलेल्या हालचाली वेगळेच संकेत देत आहेत. कुटुंबीयांमध्ये वैयक्तिक संबंध कायम असले तरी राजकीय मतभेद अजूनही स्पष्टपणे दिसत आहेत. त्यामुळे बारामतीतील आगामी राजकारण अधिक रंगतदार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शरद पवार गटाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी गेल्या काही महिन्यांपासून बारामतीत सक्रिय संपर्क मोहीम सुरू केली आहे. ते सातत्याने गावागावात दौरे करत असून नागरिकांच्या भेटीगाठी घेत आहेत. स्थानिक प्रश्न सोडवण्यावर त्यांचा भर असल्याचे दिसून येत आहे. जो लोकांचे प्रश्न सोडवेल, त्यालाच बारामतीकर साथ देतील, असे सांगत युगेंद्र पवार यांनी अप्रत्यक्षपणे निवडणुकीच्या तयारीचे संकेत दिले आहेत. त्यामुळे 2024 प्रमाणेच 2029 मध्येही ते निवडणुकीच्या रिंगणात उतरणार, अशी चर्चा जोर धरत आहे.

दुसरीकडे अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनीही बारामतीतील आपली उपस्थिती वाढवली आहे. विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणे, नागरिकांच्या सुख-दुःखात सहभागी होणे, नुकसानीच्या ठिकाणांची पाहणी करणे आणि जनता दरबाराच्या माध्यमातून समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणे, अशा माध्यमातून ते कार्यकर्त्यांमध्ये संपर्क वाढवत आहेत. कार्यकर्त्यांकडून निवडणूक लढवण्याची मागणी होत असल्याचेही जय पवार यांनी सूचित केले आहे. त्यामुळे बारामतीत त्यांचीही राजकीय एंट्री निश्चित मानली जात आहे.

दरम्यान, कर्जत-जामखेड मतदारसंघातून सक्रिय असलेले आमदार रोहित पवार यांचे नावही बारामतीच्या चर्चेत पुढे येत आहे. बारामतीत भविष्यात राजकीय भूमिका वाढवण्याची त्यांची इच्छा असल्याची चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी, माझ्याकडून तरी पवार विरुद्ध पवार होणार नाही, असे वक्तव्य केले होते. मात्र रोहित पवार यांनी त्यावर वेगळी भूमिका मांडत राजकारणात परिस्थिती बदलत असते, असे सांगितले. तसेच महायुतीसोबत असलेल्या अजित पवार गटावर त्यांनी अप्रत्यक्ष टीकाही केली.

बारामतीत नेमकी कोणाची ताकद

पवार कुटुंबातील तिसऱ्या पिढीच्या या वाढत्या हालचालींमुळे बारामतीचे राजकारण पुन्हा एकदा राज्याच्या केंद्रस्थानी आले आहे. आगामी काळात युगेंद्र पवार, जय पवार आणि रोहित पवार यांच्यातील राजकीय स्पर्धा आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 2029 च्या निवडणुकीत बारामतीत नेमकी कोणाची ताकद दिसणार आणि मतदार कोणाच्या बाजूने उभे राहणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed