Nana Patole Targets Fadnavis Govt Over Ajit Pawar Death Case

महाराष्ट्र

[ads1]

दिवंगत नेते अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूप्रकरणी विरोधकांनी राज्य सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. या दुर्घटनेबाबत पोलिसांत अद्याप एफआयआर (FIR) नोंदवण्यात न आल्यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना आता काँग्रेसनेही जाह

.

सुप्रिया सुळेंची भूमिका योग्य; सरकारकडून माहिती दडवण्याचा प्रयत्न

अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणावर भाष्य करताना नाना पटोले म्हणाले. “अजितदादांच्या मृत्यू प्रकरणात फडणवीस सरकार काहीतरी लपवत आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतलेली भूमिका अत्यंत योग्य आणि रास्त आहे.”

“सध्या सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे जे आमदार सत्तेत आहेत, त्यांनी या प्रकरणावर गुन्हा का दाखल झाला नाही, अशी कोणतीही भूमिका अद्याप मांडलेली नाही. त्यांच्या आमदारांनी एफआयआरची साधी मागणीही केली नाही. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात काय गोम दडली आहे, हे कळायला मार्ग नाही.”

सुप्रिया सुळे यांच्या प्रश्नांचा संदर्भ

यापूर्वी खासदार सुप्रिया सुळे यांनी संतप्त सवाल करत सरकारला धारेवर धरले होते. “माझा भाऊ गेला, राज्याच्या एका विद्यमान उपमुख्यमंत्र्यांचा एवढा मोठा भीषण अपघात झाला; तरीही सरकारने त्यावर साधा गुन्हा का दाखल केला नाही? राष्ट्रवादीचा गट सत्तेत भागीदार असताना त्यांच्या 40 आमदारांनी किंवा 9 मंत्र्यांनी एफआयआर आणि चौकशीवर एक शब्दही का काढला नाही?” अशी उद्विग्नता त्यांनी व्यक्त केली होती. या संदर्भात आमदार रोहित पवार यांनीही वारंवार पोलिसांत एफआयआर नोंदवण्याची मागणी लावून धरली आहे.

7.8 टक्के जीडीपीचा दावा खोटा आणि हास्यास्पद

देशाचा जीडीपी वाढल्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या ‘गुड न्यूज’वर नाना पटोले यांनी जोरदार टीका केली. “पंतप्रधानांनी सोशल मीडियावर जीडीपी वाढल्याचा आनंद व्यक्त केला, पण देशभरातील आघाडीच्या अर्थतज्ज्ञांनीच या दाव्यांची पोलखोल करत त्यांना ट्रोल केले आहे.”

“जर भारताचा जीडीपी 7.8 टक्के इतका प्रचंड वाढला असेल आणि जागतिक पातळीवर देश अव्वल ठरत असेल, तर देशात महागाई का वाढत आहे? बेरोजगारी का संपलेली नाही? शेतकरी आत्महत्या का करत आहेत? जर अर्थव्यवस्था इतकी बळकट झाली असती, तर देशात सगळीकडे आलबेल वातावरण असायला हवे होते. जनतेसमोर खोटे आकडे फेकून दिशाभूल केली जात आहे,” असा थेट निशाणा पटोले यांनी साधला.

हेही वाचा…

LIVE मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 6 वा दिवस: बीडच्या आंदोलकाचा हृदयविकाराने मृत्यू; धाराशिव अन् परभणी जिल्ह्यात कडकडीत ‘बंद’

सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासह विविध मागण्यांसाठी आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून मराठा बांधव आंतरवाली सराटीत दाखल होत असतानाच, गुरुवारी एक दुर्दैवी घटना घडली. जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या बीड जिल्ह्यातील एका मराठा आंदोलकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. येथे वाचा संपूर्ण बातमी

[ads2]

What do you feel about this post?

0%
like

Like

0%
love

Love

0%
happy

Happy

0%
haha

Haha

0%
sad

Sad

0%
angry

Angry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *