Jitendra Awhad Rides Horse Protesting Modis Call; Says Modi Will Take Us 2000 Years Back
![]()
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वैयक्तिक वाहनांचा वापर बंद करून सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचे आवाहन देशातील जनतेला केले आहे. तसेच वर्षभर सोने देखील खरेदी न करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. अनेक गोष्टींचे आवाहन मोदी यांनी केले. त्यानंतर विरोधकांनी त्
.
प्रसारमाध्यमांशी बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, पूर्वी लोक घोड्यावरून फिरायचे, बैलगाडी घेऊन फिरायचे. आता पेट्रोल आले, डिझेल आले गाड्या आल्या. आता परत एकदा 2000 वर्षांपूर्वी मागे घेऊन जाणार मोदी हे आपल्याला माहीत आहे. आता मंत्र्यांना पण आम्ही सांगणार की मंत्रालयात जाताना घोड्यावर जा, बैलगाडीवर जा, मोदींनी सांगितले आहे. आपण मोदींचे ऐकलेच पाहिजे. ते परदेशी जनता उपाशी, अशी टीका आव्हाड यांनी केली आहे.
तेल वापरावरून चंद्रकांत पटलांना टोला
पुढे बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, तेल कमी वापरा म्हणतात, महाराष्ट्रात सर्वाधिक तेल चंद्रकांत पाटील वापरतात, एवढे तेल लावतात ते. आता मला माहीत नाही की ते उद्यापासून तेल कमी वापरणार की केस कापणार. पण उद्यापासून तेल कमी वापरा. मी कोणाला सल्ला देत नाही. सल्ला मी फक्त मोदींचा ऐकतो म्हणून घोड्यावर बसलो आहे, अशी उपहासात्मक टीका आव्हाड यांनी केली.
अडानी अंबानी सोन्याच्या धंद्यात येतील
पंतप्रधान मोदींनी वर्षभर सोने खरेदी करू नका असे म्हटले आहे, यावर जितेंद्र आव्हाड म्हणाले, सोनं हा एकच धंदा आहे ज्यात अडानी अंबानी नाहीयेत. पुढच्या वर्षाच्या अखेरपर्यंत अडानी अंबानी सोन्याच्या धंद्यात येतील. मागच्या वर्षी एक रुपयाला घेतलेले सोने 1 रुपया 54 पैसे देऊन गेले आहे. तसेच भाजपच्या लोकांच्या ताफ्यातच जास्त गाड्या दिसून येत आहेत. त्यांना सगळे माफ आहे. त्यांनी गाड्या वापरायच्या, परदेशात जायचं, सर्वसामान्य जनतेने मात्र काही करू नये.
मुख्यमंत्र्यांनी घोड्यावर मंत्रालयात जावे
पुढे बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, देशात जेव्हा कम्प्युटर आले होते, तेव्हा मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी हे स्वतः बैलगाडी घेऊन संसदेत गेले होते. आमचे आता आवाहन आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेव्हा वर्षामधून निघतात मंत्रालयात येण्यासाठी, तेव्हा त्यांनी घोडा गाडी किंवा बैलगाडीमधून जावे.
