ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांचा संताप; न्याय न मिळाल्यास पुरस्कार परत करण्याचा इशारा!

0
FB_IMG_1778571539687

ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांचा संताप; न्याय न मिळाल्यास पुरस्कार परत करण्याचा इशारा!

मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ आणि लोकप्रिय अभिनेत्री उषा चव्हाण यांनी प्रशासनाच्या कथित ढिसाळ कारभाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तब्बल २६ वर्षांपासून सुरू असलेल्या न्यायालयीन लढाईनंतरही न्याय मिळत नसल्याने त्यांनी आपले सर्व शासकीय पुरस्कार परत करण्याचा इशारा दिला आहे.

नेमके प्रकरण काय?

पुण्यातील धनकवडी परिसरातील त्यांच्या मालकीच्या जमिनीवरून हा वाद सुरू असून, या प्रकरणी उच्च न्यायालयाने त्यांच्या बाजूने निर्णय दिल्याचा दावा त्यांनी केला आहे. मात्र, न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी अद्याप होत नसल्याने त्यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत.

प्रशासनावर गंभीर आरोप

पुणे महानगरपालिकेने न्यायालयीन आदेश डावलत एका खासगी बिल्डरला फायदा करून दिल्याचा आरोप उषा चव्हाण यांनी केला आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

भावनिक सवाल

“ज्या महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांनी रयतेला न्याय दिला, त्याच महाराष्ट्रात आज एका कलाकाराला स्वतःच्या हक्कासाठी एवढा संघर्ष करावा लागतोय का?” असा भावनिक सवाल त्यांनी उपस्थित केला.

पुरस्कार परत करण्याचा इशारा

तातडीने न्याय न मिळाल्यास आपले सर्व पुरस्कार स्व. आनंद दिघे यांच्या समाधीस्थळी अर्पण करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

एका दिग्गज कलाकाराला वयाच्या या टप्प्यावर न्यायासाठी अशा प्रकारे संघर्ष करावा लागणे, ही व्यवस्थेसाठी निश्चितच चिंतेची बाब मानली जात आहे.

#Limitles #UshaChavan #MarathiCinema #Justice #PuneNews #SocialIssue #BreakingNews

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *