सोलापूर हादरले!:गंधकाचा बॉक्स गाडीत ठेवताना भीषण स्फोट, व्यक्तीचे पाय झाले छिन्नविछिन्न; घटना CCTVत कैद

0
ezgifcom-resize-13_1778567855.gif




सोलापूर शहराच्या मध्यवर्ती भागात सोमवारी दुपारी एका भीषण स्फोटाने मोठी खळबळ उडाली. जुनी मिल कंपाऊंड परिसरातील ‘सहारा गन हाऊस’ या दुकानाबाहेर गंधकाच्या एका बॉक्सचा स्फोट झाला असून, यामध्ये केदारनाथ सिद्धप्पा छत्रे (वय ५३) नावाचे गृहस्थ गंभीर जखमी झाले आहेत. हा स्फोट इतका भयानक होता की, त्यात केदारनाथ छत्रे यांच्या पायांच्या अक्षरशः चिंधड्या उडाल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सहारा गन हाऊसच्या समोर उभ्या असलेल्या एका चारचाकी वाहनात गंधकाने भरलेला बॉक्स ठेवण्याचे काम सुरू होते. यावेळी हा बॉक्स अचानक हातातून निसटला आणि जमिनीवर आदळताच गंधकाचा मोठा स्फोट झाला. या स्फोटाचा आवाज इतका प्रचंड होता की, आजूबाजूचा संपूर्ण परिसर हादरून गेला आणि आवाजामुळे नागरिक भीतीपोटी रस्त्यावर आले. या दुर्घटनेत केदारनाथ छत्रे यांचे पाय छिन्नविछिन्न झाले असून ही संपूर्ण थरारक घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. तातडीने मदतकार्य आणि उपचार स्फोटानंतर सामाजिक कार्यकर्ते राज सलगर आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी केदारनाथ छत्रे यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. तिथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेत केदारनाथ छत्रे यांना आपले दोन्ही गमवावे लागले आहेत. नागरिकांमध्ये काही काळ दहशतीचे वातावरण या घटनेची माहिती मिळताच पोलीस दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिसराची नाकेबंदी केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन बॉम्ब शोधक आणि नाशक पथकालाही (BDDS) पाचारण करण्यात आले होते. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून स्फोटामागील तांत्रिक कारणांचा शोध घेतला जात आहे. शहराच्या मुख्य बाजारपेठेत आणि वर्दळीच्या ठिकाणी हा थरार घडल्याने नागरिकांमध्ये काही काळ दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. गंधकासारख्या स्फोटक पदार्थाची हाताळणी करताना सुरक्षिततेच्या नियमांचे उल्लंघन झाले का? या दिशेने आता पोलिसांचा तपास सुरू आहे. सुदैवाने या घटनेत इतर कोणतीही मोठी हाणी झाली नाही. हे ही वाचा… नवापूर एमआयडीसी परिसरात अग्नितांडव:टेक्सटाईल कंपन्या भीषण आगीच्या विळख्यात, 2-3 किलोमीटरपर्यंत धुराचे लोट नवापूर एमआयडीसी परिसरात सोमवारी दुपारी आगीचे तांडव पाहायला मिळाले. येथील नामांकित ‘निजो फॅशन प्रा. लिमिटेड’ (E-21) या टेक्सटाईल कंपनीला भीषण आग लागली असून, यामध्ये कंपनीची यंत्रसामग्री आणि कच्चा माल जळून खाक झाला आहे. आगीची भीषणता इतकी प्रचंड होती की, परिसरात २ ते ३ किलोमीटरपर्यंत धुराचे लोट दिसत होते आणि कंपनीच्या आतून झालेल्या मोठ्या स्फोटांनी संपूर्ण परिसर हादरून गेला होता. सविस्तर वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *