730-x-548-new-2026-05-12t120838376_1778568001.jpg



राज्यातील पोलिस कर्मचाऱ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. पोलिसांना घरांच्या सुविधेसाठी राज्य सरकारने 1768.08 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली असून, या निर्णयाचा लाभ 5459 पोलिस कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य

.

देवेंद्र फडणवीस यांनी सामाजिक माध्यमांवर पोस्ट करत पोलिसांच्या घरांच्या प्रश्नाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. जनतेच्या सुरक्षेसाठी दिवस-रात्र काम करणाऱ्या पोलिसांना स्वतःचे घर मिळाले पाहिजे, यासाठी आपण सुरुवातीपासूनच आग्रही असल्याचे त्यांनी म्हटले. 2014 ते 2019 या काळात मोठ्या प्रमाणात पोलिसांसाठी व्याजसवलत अनुदान योजना राबवण्यात आली होती. मात्र, महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात ही योजना बंद करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा सत्तेत आल्यानंतर ही योजना नव्याने सुरू करण्यात आल्याचेही फडणवीस यांनी नमूद केले.

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे हजारो पोलिस कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. वाढत्या घरांच्या किमती आणि आर्थिक ताणाच्या पार्श्वभूमीवर घरबांधणीसाठी मिळणारे अग्रीम अनुदान पोलिसांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. पोलिसांच्या कल्याणासाठी सरकार कटिबद्ध असल्याचा संदेश या निर्णयातून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आगामी काळात पोलिसांच्या निवासाच्या प्रश्नांवर आणखी उपाययोजना करण्यात येणार असल्याचे संकेतही या घोषणेतून मिळत आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली पोस्ट देखील पहा….

पोलिसांना घरांसाठी ₹1768.08 कोटी मंजूर! जनतेच्या सुरक्षेसाठी सातत्याने कार्यरत आपल्या पोलिसांना घरे मिळाली पाहिजे, यासाठी प्रारंभीपासून मी आग्रही राहिलो आहे. त्यामुळेच 2014 ते 2019 या काळात मोठ्या संख्येने पोलिसांना घरांसाठी व्याजसवलत अनुदान योजना राबविण्यात आली. महाविकास आघाडीच्या काळात ती योजना बंद केली गेली होती. नंतर पुन्हा आम्ही ती योजना सुरु केली. आज मला सांगताना आनंद होतो की, आमच्या 5459 पोलिसांना घरांसाठी घरबांधणी अग्रीम म्हणून 1768.08 कोटी रुपयांना मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य पोलिस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाकडे आलेल्या या प्रस्तावांसाठी ही रक्कम मंजूर करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *