संभाजीनगरात पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून तरुणाची विष प्राशन करून आत्महत्या:सासुरवाडीतच संपवले जीवन, पत्नी- प्रियकरासह चौघांवर गुन्हा दाखल

0
new-project-2026-05-12t095123975_1778559735.jpg




छत्रपती संभाजीनगरात पत्नीचे अनैतिक संबंध, प्रियकराच्या धमक्या आणि सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या मानसिक छळाला कंटाळून 35 वर्षांच्या तरुणाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना चिकलठाणा परिसरातील सावित्रीनगर येथे घडली. कृष्णा अण्णासाहेब गरड ( 35) असे मृत तरुणाचे नाव आहे. 22 एप्रिल रोजी त्याने विष प्राशन केले होते. घाटी रुग्णालयात 15 दिवस चाललेल्या उपचारादरम्यान 7 मे रोजी सकाळी त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी मृताचे वडील अण्णासाहेब गरड यांच्या फिर्यादीवरून पत्नी वैष्णवी कृष्णा गरड, प्रियकर कृष्णा दांडगे, सासू मीरा नागनाथ सोनवणे आणि सासरे नागनाथ सोनवणे (सर्व रा. सावित्रीनगर, चिकलठाणा) या चौघांविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. लग्नापूर्वीपासूनच होते प्रेमसंबंध कृष्णा गरड आणि वैष्णवी यांचा 7 वर्षांपूर्वी विवाह झाला होता. सासू मीरा सोनवणे यांच्या सांगण्यावरून वैष्णवीने कृष्णाला वेगळे राहण्यासाठी तगादा लावला होता. त्यानुसार ते गारखेडा परिसरातील हनुमाननगर येथे भाड्याने राहत होते. दरम्यान, फेब्रुवारी 2025 मध्ये कृष्णाच्या पाठीमागे घरी एक जण येत असल्याचे घरमालकाच्या निदर्शनास आले. विचारपूस केली असता वैष्णवीने तो चुलत भाऊ कृष्णा दांडगे असल्याचे सांगितले. मात्र, चौकशीत तिचे कृष्णा दांडगे याच्याशी लग्नापूर्वीपासूनच प्रेमसंबंध असल्याचे आणि ते अद्यापही सुरू असल्याचे उघड झाले. या त्रासाला कंटाळून कृष्णाने नाशिक येथील एका शोरूममध्ये आपली बदली करून घेतली होती. उपचारादरम्यान मृत्यू 18 एप्रिल रोजी कृष्णा नाशिकहून शहरात आला. 22 एप्रिल रोजी तो मुलांना भेटण्यासाठी सासुरवाडीत गेला. तेथेच त्याने विषारी औषध प्राशन केले. त्याला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, 7 मे रोजी उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. नाशिक पोलिसांच्या नावे लिहिलेला अर्ज सापडला कृष्णाच्या मृत्यूनंतर त्याच्या बॅगेची झडती घेतली असता, त्यात त्याने नाशिकच्या आडगाव पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या नावे लिहिलेला एक अर्ज सापडला. या अर्जात पत्नी वैष्णवी, प्रियकर कृष्णा दांडगे आणि सासू-सासरे यांच्याकडून होत असलेल्या अमानुष मानसिक छळाचा सविस्तर उल्लेख आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक पचलोरे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed