कृषीउन्नती मधूनच ग्रामोन्नती, राष्ट्रनिर्मिती साध्य होऊ शकते:ग्राम जयंती महोत्सवात प्रा.नरेंद्र राऊत यांचे प्रतिपादन
![]()
“शेतीच्या विकासातूनच ग्रामोन्नती, राष्ट्रोन्नती व राष्ट्रनिर्मिती साध्य होऊ शकते,” असे स्पष्ट मत नैसर्गिक शेतीतज्ज्ञ व ग्रामगीतेचे अभ्यासक प्रा. नरेंद्र राऊत यांनी व्यक्त केले. अमरावती येथील श्री गुरुदेव सेवाश्रम ट्रस्ट, राधानगर येथे ग्राम जयंतीनिमित
.
याप्रसंगी प्रा. राऊत यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या साहित्यातील ‘ग्रामगीता’ या ग्रंथाचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की, महाराजांनी ग्रामगीता ‘ग्रामनाथाला’ म्हणजेच गावातील प्रत्येक घटकाला अर्पण केली आहे. या सर्व घटकांचा कणा शेतकरी आहे. तो केवळ देशाचाच नव्हे, तर जगाचा पोशिंदा आहे. भूक ही मूलभूत गरज केवळ शेतीतूनच पूर्ण होऊ शकते. त्यानंतरच विकासाच्या इतर प्रक्रिया सुरू होतात.
आरोग्यासाठी ग्रामगीतेचा मंत्र ‘ग्राम आरोग्य’ या १४ व्या अध्यायावर प्रकाश टाकताना प्रा. राऊत म्हणाले की, यातील आरोग्य विषयक संकल्पना अंमलात आणल्यास मानवाला निरोगी जीवन जगता येईल. व्यायामाचे महत्त्व, सकाळी फिरणे आणि ध्यानधारणा या आरोग्याच्या गुरुकिल्ल्या आहेत. “हॉटेलचे खाणे म्हणजे आजाराला निमंत्रण” असा इशारा महाराजांनी अनेक वर्षांपूर्वीच दिला होता. तसेच, सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यामुळे पसरणारे संसर्गजन्य रोग आणि त्यातून होणारा गोंधळ यावर महाराजांनी व्यक्त केलेले विचार कोरोना काळात तंतोतंत खरे ठरले, असेही त्यांनी नमूद केले.
ग्रामगीतेचे ‘हृदय’ : गोवंश सुधार अध्याय प्रा. राऊत यांनी निदर्शनास आणून दिले की, राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेला आपले ‘हृदय’ म्हटले आहे, परंतु त्यातील १५ वा अध्याय ‘गोवंश सुधार’ (शेती व ग्रामसुधार) हे संपूर्ण ग्रामगीतेचे हृदय आहे. आजच्या काळात गोवंशावर आधारित नैसर्गिक शेती ही काळाची गरज आहे. गाईच्या शेण व गोमूत्राद्वारे उत्तम नैसर्गिक शेती आणि बैलांच्या साहाय्याने मशागत करणे शक्य आहे. राष्ट्रसंतांचा यांत्रिक शेतीला विरोध होता, हेदेखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
