तुटलेली खेळणी, झाडे सुकली, कचरा साचला:106 उद्यानांची कंत्राटे रखडली, दुरवस्थेमुळे ज्येष्ठ नागरिक, बंच्चे कंपनीने फिरवली पाठ
![]()
महानगरपालिका क्षेत्रात मनपाची २१८ उद्याने असून त्यापैकी १०६ उद्याने कंत्राटी तत्त्वावर दिली जातात. परंतु, जुने कंत्राट संपुष्टात आल्यानंतर नवी कंत्राटी प्रक्रियाच गेल्या काही वर्षांपासून रखडल्यामुळे मनपाच्या बहुतेक उद्यानांची दुर्दशा झाल्याचे प्रत्यक्ष पाहणीत दिसून आले. मोकळ्या जागेत लॉन नाही. गवतही उद्यानात दिसत नाही. फुलझाडे तर शोधूनही सापडली नाहीत. उद्यान म्हटले की सर्वत्र हिरवी झाडे, फुले, खेळणी, सुंदर देखावे, फुलांचे ताटवे, गारवा, सुगंध असे उत्साही वातावरण असते. परंतु, बहुतेक उद्यानांकडे गेल्यानंतर ती उद्याने वाटतच नाहीत. गणेश कॉलनी, केडिया नगर, गायत्रीनगर, दस्तूरनगर, प्रशांतनगर येथील उद्यानांकडे मनपा प्रशासनाने मागील काही उर्वरित, पान.४ ११२ उद्यानांची निगा मनपा राखते; त्यातही अनियमितता शहरातील मोठ्या व महत्त्वाच्या ११२ उद्यानांची निगा, रखरखाव मनपाकडून राखला जातो. परंतु, मनपाच्या देखभालीअभावी ही उद्यानेही फारशी सुस्थितीत नाहीत. शहरात प्रशांतनगर येथील मनपाचे उद्यान सर्वात मोठे असले तरी येथेही अनेक समस्या आहेत. कचरा, उखडलेली जमीन, बंद असलेले कारंजे, कालबाह्य झालेले देखावे दिसतात. कालवाही कोरडा पडला आहे. इतर उद्यानांची स्थिती यापेक्षा वेगळी नाही. मनपाची एकूण २१८ उद्याने शहराच्या विविध भागात असून त्यापैकी १०६ उद्याने कंत्राटी तत्त्वावर चालवली जातात. मात्र, कंत्राटच संपुष्टात आल्यामुळे कोणाचेही लक्ष नाही. उद्यानांत फिरण्याचीच इच्छा होत नाही ^महानगरपालिकेच्या उद्यानांची स्थिती अशी आहे की तेथे फिरण्याची इच्छाच होत नाही. सायंकाळी गारवा, आल्हाद मिळवण्यासाठी उद्यानं असतात. परंतु, उद्यानात गेल्यावर आपण येथे कशासाठी आलो, असे वाटते. रस्त्यावरून पायपीट केली तरी बरे, असे वाटते. इतपत उद्यानांची दुर्दशा झाली आहे. – ज्ञानेश्वर रहाटे, नागरिक. लवकर दुरुस्ती केली जातच नाही ^मनपा उद्यानं महिला, मुले, ज्येष्ठ नागरिकांच्या विरंगुळ्याचे साधन आहेत. सकाळी व सायंकाळी येथे चांगला वेळ घालवता येऊ शकतो. परंतु, उद्याने सुस्थितीत असायला हवीत. ती केवळ नावाला नकोत. अनेक उद्यानांमध्ये खेळणी तुटली असूनही खेळणी या मुलांसाठी धोकादायक आहेत. ती लवकर दुरुस्तही होत नाहीत. – माया पानबुडे, ज्येष्ठ महिला नागरिक.
