केतन अग्रवाल खून प्रकरण:सियाच केतनच्या जवळ उभी हाेती, मी तर दूर उभा होतो- चेतन चौधरी, चेतनने केतन अग्रवालच्या खुनाचा तपशील सांगितला




पुण्यातील प्रख्यात बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा केतनचा त्याची भावी पत्नी सिया गोयलने प्रियकर चेतन चौधरीच्या मदतीने लोहगड किल्ल्यावरून ४०० फूट खोल दरीत ढकलून खून केल्याचे पोलिस तपासात दिसून आले. या दोघांना न्यायालयाने २९ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. अटकेनंतर सियाचा प्रियकर चेतनने रडत रडत स्वत:चे वडील बाबूलाल चौधरी यांना सांगितले की, घटना घडली तेव्हा सिया केतनजवळ उभी होती, मी तर दूर उभा होतो. पोलिसांच्या तपासात असे निष्पन्न झाले की, जानेवारी ते जून २०२६ या सहा महिन्यात सिया व चेतनमध्ये २००४ कॉल झाले होते. १९ जून : सियाचा वाढदिवस, सासऱ्यांनी केल्या १७ रूम बुक
सियाच्या वाढदिवसासाठी सासऱ्यांनी महाबळेश्वरला १७ खोल्या बुक केल्या होत्या. पण तिने त्यापूर्वीच केतनला संपवले.
६ जून : बालीचा दौरा रद्द व्हावा म्हणून केतनचा पासपोर्ट फाडला
प्री-वेडिंग शूटसाठी बालीला केतनसोबत जायचे नव्हते. म्हणून तिने त्याचा पासपोर्ट फाडून गहाळ करून टाकला.
१८ जून : चेतनला गडावर बोलावले, केतनला संपवले
केतनला ती लोहगडावर घेऊन गेली. चेतनही त्यांच्याआधी आला होता. दोघांनी संगनमताने केतनला ४०० फूट खोल दरीत ढकलले.
४ जून : केतनला गडावर नेऊन ढकलण्याचा पहिला प्रयत्न
सियाने केतनला लोहगडावरून ढकलण्यासाठी ४ जून तारीख निवडली. पण घरच्यांनी त्यांना जाण्याची परवानगी दिली नाही.
१४ जून : गडावर नेऊन केतनला ढकलले, पण तो वाचला
सियाने ढकलल्यावर झुडपात अडकून केतन बचावला. तेव्हा साप..साप..ओरडत तिने त्याला मिठी मारून वेळ मारून नेली. पोलिसांना अशी आली शंका
कारण घटनास्थळी चेतन आला होता घटनेनंतर सिया उडवाउडवीची उत्तरे देत होती, तर घटनास्थळी चेतन आला होता. त्यावरून पोलिसांना हा अपघात नसून कट असल्याचा संशय आला होता. सिया, चेतनच्या संपर्काविषयी माहिती नाही: बाबूलाल चौधरी चेतनचे वडील बाबूलाल यांनी दिव्य मराठीला सांगितले की, मी सियाला पहिल्यांदा पोलिस ठाण्यातच पाहिले. सिया, चेतनच्या संपर्काविषयी मला माहिती नाही. सियाला ड्रिंक करायची सवय होती : केतनची आई सिया जेव्हा केतनच्या घरी आली, तेव्हा केतनच्या आईने तिला स्पष्ट सांगितले होते की, ‘आमच्या घरात कुणीही मद्यसेवन करत नाही आणि ते आम्हाला चालत नाही. लग्नानंतर मी तुला अशा कोणत्याही पार्ट्यांमध्ये पाठवणार नाही. मात्र, सियाला ड्रिंक करायची सवय होती, ही गोष्ट तिच्या आई-वडिलांनी पूर्णपणे लपवली’. बिल्डरपुत्र विशाल अग्रवाल यांचा मुलगा चेतनच्या मृत्यू प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे. सियाच्या कुटुंबाने अग्रवाल कुटुंबापासून अनेक मोठ्या गोष्टी लपवून ठेवल्याचा आरोप केतनच्या आईने केला आहे. “सिया जेव्हा आमच्या घरी आली, तेव्हा मी तिला स्पष्ट सांगितले होते की, आमच्या घरात कुणीही मद्यसेवन करत नाही आणि ते आम्हाला चालत नाही. लग्नानंतर मी तुला अशा कोणत्याही पार्ट्यांमध्ये पाठवणार नाही. मात्र, सियाला ड्रिंक करायची सवय होती, ही गोष्ट तिच्या आई-वडिलांनी आमच्यापासून पूर्णपणे लपवून ठेवली,” असा खुलासा केतनच्या आईने केला. मुलाच्या खुनाचा घटनेस सिया हिची आई, तिचा भाऊ आणि आत्यादेखील जबाबदार असून सर्वांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे. खटला फास्ट ट्रॅकवर चालवा- वडील विशाल अग्रवाल घटनेनंतर आमच्या कुटुंबाच्या एकुलत्या एक मुलाला गमावले आहे. आता आमच्या जीवनात दु:खाशिवाय काहीच राहिले नाही. केतन याचा कोणताही दोष नसताना त्याचा जीव घेणाऱ्या मारेकऱ्यांवरील खटला सरकारने फास्ट ट्रॅकवर चालवून लवकरात लवकर त्यांना फाशी द्यावी, जेणेकरून केतनच्या आत्म्याला शांती लाभेल, अशी मागणी केतन अग्रवाल याचे वडील विशाल अग्रवाल यांनी केली आहे. आम्ही गोयल कुटुंबाला गेल्या अनेक वर्षांपासून ओळखतो. हे लग्न ठरवण्यामध्ये मध्यस्थी करणाऱ्या मित्तल दांपत्यालाहीअनेक वर्षांपासून ओळखतो. ते असा दगा देतील, आम्हाला फसवतील असे कधी वाटले नव्हते, असेही ते म्हणाले. चेतनने स्वतःचा फोन दुकानात ठेवला होता चेतनचे वडील बाबूलाल चौधरींनी दिव्य मराठीशी बोलताना सांगितले की, सियासोबत आमचे कधीही भेटणे झाले नव्हते. तिला कधी पाहिलेदेखील नव्हते किंवा तिचे नावही ऐकले नव्हते. या घटनेनंतर तिला पहिल्यांदाच पोलिस चौकीत पाहिले. चेतन आणि ती संपर्कात असल्यास त्याबाबत कल्पना नाही. माझ्या मुलास या घटनेत फसवले जात आहे. अटकेनंतर मी त्याला भेटलो. तेव्हा त्याने मला रडत रडत सांगितले की, त्या दि‌वशी मी संबंधित ठिकाणी नव्हतो. तर दूर उभा होतो. मला फसवले जात आहे. चेतन लोहगडावर कशासाठी गेला याबाबतची कोणती माहिती त्याने कुटुंबाला दिली नव्हती. त्या दिवशी घरातून तो लवकर गेला आणि जाताना त्याने आईला सांगितले की, वडिलांना आज लवकर दुकानात पाठव. चेतन घरातून बाहेर पडल्यानंतर दुकानात गेला होता. त्याने दुकानातील एका कामगाराचा फोन स्वतःकडे घेऊन स्वतःचा फोन दुकानात ठेवला होता. कामानिमित्ताने मी बाहेर जात असून दुपारपर्यंत परत येईन असे त्याने सांगितले होते. मागील तीन वर्षांपासून चेतन व्यवसायात लक्ष घालत होता. त्याने आतापर्यंत विविध क्रिकेट स्पर्धांमध्ये शंभर ते दीडशे ट्रॉफी मिळवल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, घटनेपूर्वी सियाने चेतनसोबत पुण्यातील एका कॅफेमध्ये मीटिंग केली. त्या कॅफेतील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी जप्त केले आहे. केतन हा ट्रेकर असल्याने त्याला किल्ल्यांची आवड असल्याची माहिती सिया हिला होती. त्यामुळे त्याला लोहगड किल्ल्यावर घेऊन जाऊन मारण्याचा कट तिने रचला, असेही पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. केतन व स्वत:चे कुटुंब हे व्यावसायिक आणि प्रतिष्ठित असल्याने त्याच्यासोबत लग्न मोडून सामाजिक प्रतिष्ठा, कुटुंबाची बदनामी टाळण्यासाठी थेट त्याला संपवण्याचे पाऊल तिने उचलले. केतनला संपवल्यावर सहानुभूती मिळवत चेतनशी सहा महिन्यांत विवाह करण्याचेही तिने ठरवले होते. सियाच्या खोट्या प्रेमाचा केतनच्या खुनाने भयंकर शेवट चेतनने लोहगडवर जाताना स्वतःचा मोबाइल सोबत ठेवला नाही. कामगाराच्या मोबाइलवरून तो सियाच्या संपर्कात राहिला. घटनेनंतर सिया, चेतन प्रत्यक्ष भेट होऊ शकली नाही. मात्र, दोघांचे काही कॉल झाले, असे पोलिस तपासात समोर आले. आरोपीची गाडी जप्त करणे, आरोपीच्या दुकानातील कामगाराचा जबाब नोंदवणे, गडावर त्यांचे आणखी कोणी साथीदार उपस्थित होते का याची चौकशी करणे, केतनच्या पासपोर्टविषयी माहिती घेणे, आरोपींचे मोबाइल जप्त करणे, कॉलचे विश्लेषण करायचे असल्याचे पोलिसांनी सांगितले. लोहगडाच्या दरीत मृतदेह एकीकडे केतन आपल्या आयुष्याची स्वप्नं रंगवत असताना सियाने केतनला लोहगड किल्ल्यावर बोलावून घेतले. तिथे आधीच हजर असलेल्या चेतनच्या मदतीने होणाऱ्या पतीला सियाने शांत डोक्याने कायमचे संपवले. चेतनच्या मदतीने संपवले केतनला केतन तिच्या प्रेमात पार बुडाला होता, पण सियाच्या या हसऱ्या चेहऱ्यामागे त्याला संपवण्याचा भयंकर कट दडलेला होता. ती केवळ योग्य संधीची वाट पाहत होती आणि चेतनच्या मदतीने तिने केतनला संपवले. केतन तिला रोज सरप्राइज देऊन खुश करत होता, पण सियाच्या मनात मात्र एक वेगळाच भयानक कट शिजत होता. वरवर ती खोटा आनंद दाखवत असली तरी आतून ती त्याला कायमचे संपवण्याचा विचार करत होती. त्याच्या आंधळ्या प्रेमाचा फायदा घेत, योग्य वेळ मिळताच त्याची हत्या करण्याचा प्लॅन तिने आधीच तयार केला होता. म्हणाली, हदयास घर मिळाले साखरपुड्याला एक महिना पूर्ण झाल्यावर सियाने सोशल मीडियावर लिहिले, “माझ्या हृदयाला घर मिळून एक महिना झाला.” हे वाचून केतनला वाटले की ती त्याच्यावर खूप प्रेम करते. सियाचे हे गोड शब्द केवळ एक दिखावा होता. सोशल मीडियावर केली पोस्ट सोशल मीडिया पोस्टमध्ये सिया आणि केतन एकत्र रोमँटिक डान्स करताना दिसले. बाजूलाच टेबलवर वाढदिवसाचा सुंदर केक ठेवला होता. वरवर पाहता हे एक अतिशय आनंदी जोडपे वाटत होते. महिनाभर प्री-बर्थडे सेलिब्रेशन सियाचा वाढदिवस खास बनवण्यासाठी केतनने एक महिना आधीच तिचे ‘प्री-बर्थडे’ सेलिब्रेशन सुरू केले. महिन्यात त्याने तिला दररोज नवनवीन सरप्राइज दिले. कधी तिचे आवडते चॉकलेट्स, कधी सुंदर फुले, तर कधी एखादी खास भेटवस्तू देऊन तो तिला रोज आनंदित करत होता. त्याच्या या गोड प्रयत्नांमुळे सियाचा वाढदिवस खऱ्या अर्थाने अविस्मरणीय झाला. केतनच्या बहिणीला आली शंका
सिया देत होती उडवाउडवीची उत्तरे
केतनची बहीण संजनाने माझा भाऊ कसा पडला, असे म्हणत काही प्रश्न विचारले. त्याची उत्तरे सियाला देता आली नाही. ही बाब संजनाने कुटुंबाला सांगितली होती. ३१ मे : पहिल्यांदा सिया आणि केतन गेले लोहगडावर
उत्तम ट्रेकर असलेल्या केतनला घेऊन सिया लोहगडावर गेली. तेव्हा तिने केतनला नेमके कुठून ढकलता येईल, याची रेकी केली. सहा महिन्यांत दोघांमध्ये २००४ कॉल पोलिसांनी सियाचा सीडीआर काढला तेव्हा त्यातून ती चेतन चौधरीसोबत सातत्याने मोबाइलवर बोलत असल्याचे उघड झाले. जानेवारी ते जून २०२६ या कालावधीत दोघांचे २००४ कॉल्स झाले होते. दोघे तब्बल २३८ तास एकमेकांशी बोलले होते. यामुळे पोलिसांना चेतन चौधरीवर संशय आला. केतनच्या मृत्यूनंतर सियाचा जबाबही पोलिसांना संशयास्पद वाटला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *