एनसीआरबी रिपाेर्ट:गृहिणींच्या आत्महत्या दुप्पट; दर तासाला 5 जणींचा शेवट, आत्महत्येचे सर्वात माेठे कारण काैटुंबिक वाद, विवाहित महिलांचे प्रमाण अधिक
![]()
देशाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर शासनासह सर्वत्रच चर्चा केली जाते. मात्र, ‘एनसीआरबी’च्या ताज्या अहवालातून एक अत्यंत धक्कादायक आणि अस्वस्थ करणारे वास्तव समोर आले आहे. देशात शेतकऱ्यांच्या (६.२%) तुलनेत गृहिणींच्या (१३%) आत्महत्यांचे प्रमाण दुप्पट झाले आहे. २०२४ मध्ये तब्बल २२,११३ गृहिणींनी जीवन संपवले असून, दर तासाला ५ विवाहिता मृत्यूला कवटाळत आहेत. चूल आणि मूल सांभाळणाऱ्या या महिलांच्या वाढत्या आत्महत्यांमागे कौटुंबिक वाद व हिंसाचार, वंध्यत्व आणि आजारपण हीच सर्वात प्रमुख कारणे असल्याचे वास्तव देखील या प्रकारामुळे उघड झाले अाहे. एकल महिलांपेक्षा विवाहित अधिक देशातील आत्महत्या करणाऱ्या ४५,२४५ महिलांपैकी २७,६१२ विवाहित आहेत. तर अविवाहित, विधवा, घटस्फाेटिता अशा एकल महिलांची संख्या १५,२२७ इतकी आहे.
