भोंदू खरात प्रकरण:रुपाली चाकणकरांना वाचवण्यासाठी सुनील तटकरेंचे प्रयत्न, अंजली दमानियांचा खळबळजनक दावा

0
316anjalidamaniaonnitingadkari-youtube-googlechrom_1778394735.gif




भोंदू खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांना वाचवण्याचा मोठा प्रयत्न झाला. खासदार सुनील तटकरे यांनी चौकशी होऊ नये म्हणून आटोकात प्रयत्न केले ते ढाल म्हणून त्यांच्या समोर उभे होते, पण मी डीजींना पत्र पाठवले होते की सर्वांची चौकशी झालीच पाहिजे, त्यामुळेच रुपाली चाकणकर यांना चौकशीसाठी बोलवण्यात आले, असे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी म्हटले आहे. अंजली दमानिया म्हणाल्या की, रुपाली चाकणकर या महिला आयोगाच्या अध्यक्षपदापर्यंत कशा पोहचल्या या गोष्टी बाहेर आल्या पाहिजे. यासाठी रुपाली चाकणकर यांची वकील न घेता चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी दमानिया यांनी केली आहे. चौकशीतून सर्व समोर येईल बजरंग सोनवणे म्हणाले की, अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर असो की आणखी कोणी असो ते समोर येईल. चाकणकर तर महिला आयोगाच्या अध्यक्ष होत्या पण महिलावर अत्याचार झाला अशा तक्रारी 14 महिलांनी दिल्या आहेत. या तक्रारीच्या आधारे सरकारने एसआयटी स्थापन करत चौकशी केली आहे. खरातची पत्नी फरार आहे, यामध्ये त्याचे कुटुंब सहभागी होते का हे सुद्धा चौकशीमधून समोर येईल. चाकणकरांची चौकशी होणार मुख्य आरोपी अशोक खरातसोबतचे काही फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर रुपाली चाकणकर यांच्यावर विरोधकांनी गंभीर आरोप केले होते. चाकणकर या खरातला आपला ‘गुरू’ मानत असल्याने त्यांनी यापूर्वीच्या काही प्रकरणांत राजकीय हस्तक्षेप केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी लावून धरली होती. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर आज नाशिकमधील विशेष तपास पथकासमोर चौकशीसाठी हजर राहणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed