विहीर खचल्याने वडिलांसह 2 मुले गाडली गेली:संभाजीनगरच्या धानोऱ्यातील मन सुन्न करणारी घटना; मोटार पंप बसवताना दुर्घटना

0
copy-of-db-temp-photo-resize-marathi-2026-05-10t11_1778393556.png




शेतातील विहिरीतून मोटारपंप बसवताना अचानक विहीर खचून झालेल्या दुर्घटनेत वडिलांसह 2 मुलांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यात घडली आहे. एका क्षणात कुटुंबातील 3 कर्ते पुरुष गेल्यामुळे पीडित कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, सिल्लोडच्या धानोरा गावात शनिवारी रात्री ही मन सुन्न करणारी घटना घडली आहे. बाजीराव सर्जेराव काकडे, आजिनाथ बाजीराव काकडे व श्याम बाजीराव काकडे अशी मृतांची नावे आहेत. हे तिघेही शनिवारी रात्री 9.30 च्या सुमारास शेतातील विहिरीत उतरून मोटार पंप बसवण्याचे काम करत होते. यावेळी अचानक विहीर खचली व तिचे कठडे या तिघांच्या अंगावर कोसळले. त्यात हे तिघेही विहिरीत गाडले गेले. कुणाच्याही काहीएक लक्षात येण्यापूर्वीच ही घडली. त्यामुळे कुणालाही सावरण्याची संधी मिळाली नाही. विहीर खचल्यानंतर घटनास्थळी एक मोठा आवाज झाला. हा आवाज ऐकूण गावकऱ्यांनी विहिरीच्या दिशेने धाव घेतली. त्यांनी घटनास्थळी तात्काळ मदतकार्य सुरू केले. त्यांनी मिळेल त्या साधनांनी माती व दगडांचा ढिगारा बाजूला करण्याचे काम सुरू केले. पण काकडे पिता-पुत्रांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढेपर्यंत त्या तिघांचाही मृत्यू झाला होता. बाजारीव काकडे व त्यांची दोन्ही मुले कष्टाळू होते. ते आपल्या कुटुंबासाठी एकदिलाने काम करत होते. त्यामुळे त्यांचा असा दुर्दैवी अंत झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. तसेच गावकऱ्यांनाही मोठा धक्का बसला. मृतांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. नेमकी कशी घडली घटना? मृत बाजीराव काकडे यांच्या शेतातील विहिरींचे बांधकाम चालू होते. विहिरींच्या भोवती लावलेले सिमेंटचे कडे ढासळू नये म्हणून मृत बाप व मुले रात्री विहिरीतील पाणी काढण्यासाठी गेले होते. विहिरीत खाली उतरुन पाणी काढत असताना विहीर ढासळली. यात तिघांचा दबून मृत्यू झाला. मृत बाजीराव काकडे यांच्या पत्नी एका लग्नाहून शेतातील घरी परत आल्या. तेव्हा सदर प्रकार समोर आला. माहिती मिळताच ग्रामस्थांनी धाव घेतली व दोन मोठे एलआर (पोकलेन) यंत्र बोलावले. एलआर यंत्राच्या साह्याने माती काढून तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आहे. रविवारी सकाळपर्यंत मृतदेह काढण्याचे काम सुरु होते. नगरसेवक मतीन पटेलच्या घरावर चालणार बुलडोझर दुसरीकडे, नाशिक टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खानला आश्रय दिल्याप्रकरणी एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेल याच्या घरावर बुलडोझर चालवला जाण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेने तशी नोटीस मतीन पटेल यांना दिली आहे. प्रशासनाने शनिवारी मतीन पटेल यांच्या नारेगाव रोड व कैसर कॉलनी या 2 ठिकाणच्या त्यांच्या बेकायदा घरांसह दुकाने व कार्यालयांना नोटीस बजावून अनधिकृत बांधकामे का पाडू नये, असा इशारा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed