बोगस बियाणे विकणाऱ्या केंद्रांवर धाडसत्र राबवा:वर्ध्यात पुन्हा 'बोगस बियाणे' प्रकरणाची पुनरावृत्ती टाळा, दादा केचे यांची सरकारकडे मागणी
![]()
लोकप्रतिनिधी हा जनतेचा आणि विशेषतः बळीराजाचा प्रतिनिधी असतो. शेतकऱ्यांचे हित जोपासणे हे त्याचे आद्यकर्तव्य आहे. जर आपल्याला ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करायची असेल, तर शेती पिकांना योग्य भाव मिळण्यासोबतच दर्जेदार निविष्ठा मिळणे अत्यंत आवश्यक आहे, असे भाजप नेते दादाराव केचे यांनी म्हटले आहे. तर आगामी पेरणीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शेतकरी समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधले. दादाराव केचे म्हणाले की, कृषी विभागाने कृषी केंद्रावर धाडसत्र राबवले पाहिजे. जेणेकरत शेतकऱ्यांना बोगस बियाणे आणि कीटक नाशके मिळणार नाही. लोकप्रतिनिधी हा जनतेचा आणि शेतकऱ्यांचा प्रतिनिधी आहे. शेतकऱ्याचे हीत जोपासणे हे त्याचे काम आहे. शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था जर बळकट करायची आहे तर शेतकऱ्यांच्या पीकांना भाव योग्य दिला गेला पाहिजे. तर बी बियाणे आणि खते जर बोगस मिळाले तर पीकं येतील कशी असा सवाल केचे यांनी केला आहे. शेतकऱ्यांचे महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावावे दादाराव केचे म्हणाले की, सरकारने शेतकऱ्यांचे महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावले पाहिजे. पुढच्या महिन्यात पेरणीसाठी शेतकऱ्यांना चांगले बियाणे मिळावे यासाठी सरकार काम करणार आहे. मागील पेरणीवेळी बोगस बियाणे आणि बोगस कीटकनाशकांमुळे वर्धा जिल्हा चर्चेत आला होता. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. अनेकांचे सोयाबीय उगवले नाही. यावर्षी तर अजून नाजूक परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना 24 तास वीज मिळावी दादाराव केचे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना 24 तास वीज मिळावी म्हणून सौर ऊर्जा प्रकल्प राबवला आहे. पण शेतकऱ्यांना सौरऊर्जा प्रकल्प लावल्यावर पाणी वर येत नाही ही ओरड आहे. सौर ऊर्जा प्रकल्पासोबतच शेतकऱ्यांना इलेक्ट्रिक मोटर पंप द्यावे अशी भूमिका शासनाने घेतली तर शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल. काही ठिकाणी सौर पंप कामी येत नाही त्या ठिकाणी तरी इलेक्ट्रिक पंप देण्यात यावे अशी शेतकऱ्यांची इच्छा आहे.
