आर्य चाणक्य विद्यालयाच्या यशाची परंपरा यंदाही कायम

0
240_177832582369ff193fcb69a_paithan1111.jpg




येथील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई द्वारा संचलित आर्य चाणक्य माध्यमिक विद्यालयाचा एसएससी बोर्ड परीक्षेचा निकाल ९८.०३ टक्के लागला असून प्रथम प्राजक्ता जयदीप हावनूर ९७ टक्के, प्रगती पांडुरंग कापसे ९७.०० टक्के द्वितीय, तुषार दत्तात्रय भांड ९५.२० टक्के तृतीय, भक्ती विष्णु जाधव ९४.६० टक्के चतुर्थ व ऋतुजा गणेश गिरगे ९४.४० टक्के गुण घेऊन पाचवा क्रमांक पटकाविला आहे. तसेच कल्याणी दत्तात्रय काळे हिने ९४ टक्के गुण प्राप्त केले असून ९० % पेक्षा अधिक गुण प्राप्त करणारे विद्यार्थी १६, विशेष प्राविण्य ९८, प्रथम श्रेणी ६६, द्वितीय श्रेणीत २० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेंद्र आलुरकर, कार्यवाह डॉ. हेमंत वैद्य, विद्यासभेचे अध्यक्ष डॉ. जयंत जोशी, विद्यासभेचे उपाध्यक्ष तथा आर्य चाणक्य विद्या मंदिर संकुलाचे पालक उमेश जगताप, प्रशासकीय अधिकारी चंद्रकांत मुळे, केंद्रीय प्रशासन समितीचे सदस्य विजयराव चाटुपळे, स्थानिक व्यवस्था मंडळाचे अध्यक्ष डॉ. पद्मकुमार कासलीवाल, कार्यवाह जुगलकिशोर लोहिया, कोषाध्यक्ष मनोज शुक्ल, माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष नंदकिशोर मालानी, प्राथमिक शालेय समितीचे अध्यक्ष शिवाजी मारवाडी, संचालक डॉ .राम लोंढे, अनिल कावसानकर, शरद बीडकर, किशोर भाकरे, रेणुकादास गर्गे, रविंद्र साळजोशी, विजय पापडीवाल, किशोर चौहान, डॉ. सुनिल गायकवाड, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका ज्योती जोशी, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक तथा केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य भास्करराव कुलकर्णी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed