भाेंदूगिरीचा कॅप्टन:खरात साक्षीदारांवर संतापला; म्हणाला, ‘तुमच्यामुळे अडचण’

0
orig_new-project-2026-05-02t101017470_1778289355.jpg




शिर्डी येथील गाजत असलेल्या जमीन खरेदी-विक्री व्यवहार प्रकरणात अटकेत असलेल्या भोंदू अशोक खरातची पोलिसांनी सलग पाच दिवसांपासून कसून चौकशी केली आहे. तपास यंत्रणांनी या व्यवहारातील आर्थिक व्यवहार आणि दस्तऐवजांची बारकाईने छाननी केली आहे. तपासाच्या अनुषंगाने पोलिसांनी जमीन व्यवहाराशी संबंधित साक्षीदार, मूळ जमीन मालक आणि अशोक खरात यांची समोरासमोर बसवून चौकशी केली. तेव्हा भोंदू खरात या साक्षीदारांवरच संतापला. ‘तुमच्यामुळे मी वादात अडकलो’, असा त्याच्या संतापण्याचा सूर होता. दरम्यान, खरातची पोलिस कोठडी शनिवारी संपत आहे. पोलिसांनी साक्षीदार सचिन वाणी, प्रभाकर गुंजाळ, भाऊसाहेब चौधरी आणि जमीन मालक रावसाहेब गोंदकर यांना भोंदू खरातसमोर बसवून समोरासमोर व्यवहारांबाबत विचारपूस करण्यात आली. साक्षीदारही आक्रमक शिर्डी येथील जमीन व्यवहार प्रकरणाच्या चौकशीत एक नाट्यमय वळण समोर आले आहे. पोलिस कोठडीत असलेल्या अशोक खरात आणि संबंधित साक्षीदारांची समोरासमोर चौकशी करण्यात आली. या वेळी साक्षीदार कमालीचे आक्रमक झाले होते. “व्यवहार रद्द करण्याची मागणी आम्ही आधीच केली होती, मात्र तेव्हा तुम्ही बड्या पोलिस अधिकाऱ्यांची नावे सांगून आम्हाला गप्प केले. आता प्रकरण अंगलट आल्यावर आम्हालाच जबाबदार का धरता?’ असा थेट सवाल साक्षीदारांनी खरातला विचारला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed