अलफिया खानम हिचे दहावी परीक्षेत यश. इकरा उर्दू हायस्कूल मध्ये दुसरा क्रमांक मिळवित घेतले 87 टक्के गुण
नांदेड (प्रतिनिधी)- दैनिक नांदेड चौफेरचे संपादक डॉ मोहम्मद आरीफखान पठाण यांची कन्या इकरा उर्दू हायस्कूल इम्रान कॉलनी या शाळेची विद्यार्थिनी कु अलफिया खानम हिने दहावी परीक्षेत 87 टक्के गुण प्राप्त करून दुसरा क्रमांक मिळवला आहे.तिच्या यशाबद्दल खान परिवारात अभिनंदनाचा वर्षाव होत असून सर्वत्र कौतुक होत आहे. दरम्यान कु .अलफिया खानम हिचे पालक डॉ मोहम्मद आरीफखान पठाण यांनी आपल्या मुलीला पेढा भरवून शाबासकी दिली आहे.
अलफिया खानम बालपणापासून अत्यंत हुशार आणि चाणाक्ष तसेच मेहनती विद्यार्थी म्हणून अल्फियाची ओळख इकरा उर्दू हायस्कूल मध्ये आहे. सातवी बोर्ड परीक्षे नंतर ती सलग 90 टक्के गुण मिळवून आपले शैक्षणिक कसब दाखवून दिले आहे.87 टक्के गुण मिळवून परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर सुधा ती नाराज आहे. तिचे अनुमान 95 टक्केच्या पर गुण मिळावे या हेतूने ती रात्रं दिवस अभ्यास करायची. यामुळे तिचा हिरमोड झाला आहे. यामुळे तिचे वडील यांनी समजावून सांगत धीर दिला की 12 परीक्षेत आपली शैक्षणिक कामगिरीची जादू दाखवून देण्यासाठी पुढचा टर्म आहे ही तर पहिली पायरीची सुरुवात आहे. नाराज होण्यास अर्थ नसून सतत अभ्यास करून 12 वीत यशस्वी गरुड झेप घेऊन सर्वांना आनंदाचा धक्का देणे यावर आपले विश्वास टिकून ठेवावा भविष्यात तोच यशस्वी होतो असा सल्ला देऊन आपल्या मुलीला पुढच्या टर्मची शुभेच्छा देऊन पेढा भरविला आहे.या यशाबद्दल खान परिवार आणि आजी. आजोबा. मावशी. मामा. भाऊ. काका. काकू. आंटी. अंकल. मावस बंधू. चुलत भाऊ बहीण. सहित सर्वच नातेवाईकांनी भरभरून कौतुक केले आहे. आणि भेट देऊन अल्फियाचा सत्कार करण्याची रीघ लागली आहे. परिवारातील ही पहिली मुलगी आहे जिने 87 टक्के गुण मिळवून आपल्या परिवारात आपली छाप पाडली आहे.वास्तव न्यूज लाईव्ह परिवार सुद्धा अलफिया खानमच्या यशाचे कौतुक करीत आहे.
Post Views: 23
