Chandrakant Kaire Demand to Ban MIM Party Over Nida Khan Case

0
db-temp-cover-marathi-2026-05-08t190104650_1778247122.jpg



नाशिकच्या बहुचर्चित धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान हिला छत्रपती संभाजीनगरमध्ये अटक करण्यात आल्यानंतर जिल्ह्यासह राज्याचे राजकारण तापले आहे. निदा खानला लपवण्यामागे एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांचा हात असल्याचा खळबळजनक आरोप राज्याचे मंत्री संजय शि

.

नाशिकमधील टीसीएस कंपनीतील धर्मांतरण प्रकरणात आरोपी असलेली निदा खान ही गेल्या काही दिवसांपासून पोलिसांना चकवा देत होती. नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने २ मे रोजी तिचा अटकपूर्व जामीन फेटाळला. अखेर गुरुवारी रात्री छत्रपती संभाजीनगरच्या नारेगाव परिसरातून तिला ताब्यात घेण्यात आले. आज तिला नाशिक न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने तिची ११ मे पर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.

‘एमआयएम’वर बंदी घाला; चंद्रकांत खैरेंची मागणी

ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी या प्रकरणावरून एमआयएमवर थेट निशाणा साधला आहे. “ज्या भागातून निदा खानला अटक करण्यात आली, तिथे अनेक अवैध धंदे सुरू आहेत. एमआयएमचे माजी नगरसेवक मतीन पटेल आणि त्यांचे ‘बॉस’ इम्तियाज जलील यांनीच या मुलीला आश्रय दिला होता,” असा गंभीर आरोप खैरे यांनी केला. तसेच, एमआयएम पक्षावर बंदी घालण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असून मतीन पटेल यांना तातडीने अटक करण्याची मागणीही त्यांनी केली.

हे तर मोठे आंतरराष्ट्रीय षडयंत्र – गोपीचंद पडळकर

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनीही या प्रकरणात उडी घेत याला एक मोठे ‘षडयंत्र’ म्हटले आहे. सांगलीच्या जतमध्ये बोलताना पडळकर म्हणाले, “निदा खानला मदत करण्यात इम्तियाज जलील यांची मुख्य भूमिका आहे. ती संभाजीनगरमध्ये सापडणे हा योगायोग नसून नियोजित कट आहे. पोलिसांनी जलील आणि संबंधित नगरसेवकाची कसून चौकशी करावी.” तत्पूर्वी, राज्याचे मंत्री संजय शिरसाट यांनीही जलील यांच्यावर अशाच प्रकारचे आरोप केले होते.

इम्तियाज जलील यांचे प्रत्युत्तर

दरम्यान, मंत्री संजय शिरसाट यांनी केलेल्या आरोपांना इम्तियाज जलील यांनी फेटाळून लावले आहे. मंत्री संजय शिरसाट यांच्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले, “मी कोणत्याही पालकमंत्र्यांना कवडीचीही किंमत देत नाही.” आपल्यावर होत असलेले आरोप बिनबुडाचे असून हे निव्वळ राजकीय द्वेषातून केले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हे ही वाचा…

निदा खानला MIM च्या नगरसेवकाने लपवले:पोलिसांची मतीन पटेल यांना नोटीस, मोबाईलही जप्त; 2 महिन्यांपूर्वीच खरेदी केला होता फ्लॅट

नाशिकच्या बहुचर्चित टीसीएस धर्मांतर व लैंगिक शोषण प्रकरणातील एक आरोपी असणाऱ्या निदा खानला छत्रपती संभाजीनगर येथील एमआयएमच्या एका नगरसेवकाने लपवून ठेवले होते अशी धक्कादायक बाब समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी सदर नगरसेवकाला नोटीस बजावून त्याचा मोबाईलही जप्त केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची मूळे आणखी खोलवर जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सविस्तर वाचा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *