अवकाळी पावसाची हजेरी,‎ तापमानाचा पारा 40 अंशांवर‎:बार्शीटाकळी, मूर्तिजापूर तालुक्यात पावसाच्या सरी

0
orig_new-project-2026-05-08t090427760_1778211309.jpg




मंजू अकोला तालुक्यातील बोरगावमंजू, काटेपूर्णा, वणी रंभापूर, पातूर नंदापूर आदी गाव आणि परिसरात मध्यम स्वरूपाच्या तसेच बार्शीटाकळी तालुक्यातील पिंजर व मूर्तिजापूर आणि पातूर तालुक्यात काही ठिकाणी तुरळक पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे, दिवसभराच्या कमाल तापमानात घट झाली ७ मे रोजी कमाल तापमान ४०.१ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते, तर किमान तापमान २७.५ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. गुरुवारी दुपारी शहरातील मलकापूर, शिवणी, शिवर,खडकी परिसरात पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे दिवसभर काहीसे ढगाळ वातावरण होते. हवामान तज्ज्ञांच्या मते, पुढील काही दिवसांत तापमानात फारशी घट होण्याची शक्यता नसून, उष्णतेची लाट कायम राहण्याची चिन्हे आहेत. शेतकऱ्यांसह वऱ्हाडींची उडाली धांदल : पीक कडधान्य घरात येणार तोच ७ मे रोजी सकाळपासून उन्हाचा पारा दुपारपर्यंत चढता होता, मात्र दुपारी साडेबाराच्या सुमारास वातावरणात अचानक बदल झाला, मेघ गर्जनासह वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने, लग्न लागण्या अगोदरच मंडपात पळापळ झाली. आंबा उत्पादक शेतकरी संकटात गुरुवारी दुपारी वादळीवाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्याने आंबा वृक्षावरुन खाली कोसळला त्यामुळे आंबा पिकून बाजारात जाण्याऐवजी कैऱ्या खाली पडल्या. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले, त्यामुळे आंबा उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. दरम्यान, बोरगाव मंजूसह परिसरात वाशिंबा, डोंगरगाव,अन्वी मिर्झापूर, वणी रंभापुर,पळसो,सोनाळा काटेपुर्णा, पातूर, म्हैसाग आदी गावांत वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने आंब्याचे मोठे नुकसान झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed