मुंबईच्या रस्त्यांचे 7 हजार कोटी गेले कुठे?:हिंदी परीक्षेची स्थगिती पुरेशी नाही, ती कायमची रद्द करा, आझमी प्रसिद्धीसाठी हापापलेला मूर्ख माणूस- संदीप देशपांडे
![]()
मुंबईमध्ये स्त्यांसाठी यापूर्वी 7 ते 8 हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले ते कुठे गेले? ते सुशोभीकरणासाठी लायटिंग लावण्यात आले ते कुठे गेले? असा सवाल मनसे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी केला आहे. मुंबईमध्ये महापौर, उपमहापौर नाल्याचे पाहणी दौरे करत आहेत पण त्यातून नाले तुंबणार नाही याची शाश्वती ते देणार का? केवळ बातम्यासाठी महापौर-उपमहापौरांचे दौरे सुरू आहेत, असे देशपांडे यांनी म्हटले आहे. यावर सर्व पक्षीय नगरसेवकांनी सभागृहात प्रश्न विचारले पाहिजेत. संदीप देशपांडे म्हणाले की, महाराष्ट्र सरकारचे राजपत्रित आणि अराजपत्रित अधिकारी यांना हिंदी भाषेची परीक्षा सरकार घेणार होते. पण मनसेने विनंती केल्यानंतर मंत्री उदय सामंत यांनी त्या परीक्षेला स्थगिती दिली मी त्यांचे आभार मानतो. ही परीक्षा कायमची रद्द व्हावी यासाठी आम्ही त्यांची भेट घेत त्यांना निवेदन देणार आहोत. ही परीक्षा कायमची रद्द व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करू. भाषा लादण्याचा प्रयत्न करू नये संदीप देशपांडे म्हणाले की, महाराष्ट्रात कुठलीही भाषा लादल्याचा प्रयत्न आम्ही सहन करणार नाही. रेल्वेमध्ये गुजराती भाषेत लागलेल्या बोर्डवर बोलताना देशपांडे यांनी असे म्हटले आहे. दिल्लीमध्ये काही भैय्ये बसले आहेत त्यांना खुश करण्यासाठी महाराष्ट्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्र सरकारने मराठी भाषेची आणि स्वत:ची अस्मिता जपली पाहिजे. मराठी भाषा ही अभिजात भाषा आहे तर हिंदी भाषा ही आता 100 ते 150 वर्षांपूर्वीची भाषा आहे. मराठी भाषेला एक ऐतिहासिक महत्त्व आहे. ती समृद्ध करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी काम केले. ..त्यांनी मुंबई सोडून जावे संदीप देशपांडे म्हणाले की, अबू आझमी हे मुर्ख माणूस आहे केवळ चर्चेत येण्यासाठी त्यांच्याकडून चुकीचे वक्तव्य केले जातात, असा टोला देशपांडे यांनी लगावला आहे. त्यांना फंड दिला की ते सगळे काही म्हणणार, त्यांना मदत केली के ते सर्व काही करतात आपण त्यांचा इतिहास पाहिला आहे. कोळी बांधव जर मुंबईमध्ये मासे नाहीतर काय जिलेबी आणि फाफडा विकणार का? असा सवाल देशपांडे यांनी केला आहे, असे असेल तर आयुक्ताच्या तोंडात आम्ही जिलेबी घालू. ज्यांना माशाचा वास सहन होत नाही त्यांनी गुजरातला निघून जावे मुंबईत राहण्याची गरज नाही. इथे रहायचे असेल तर मराठी माणसांप्रमाणे रहावे लागेल तुमची दादागिरी इथे चालणार नाही. आयुक्तांना खुर्चीवर रहायचे का नाही हे त्यांनी ठरवावे, गुजरात्यांची नोकरी करण्यासाठी त्यांना इथे ठेवलेले नाही. दौऱ्यातून काय साध्य झाले संदीप देशपांडे म्हणाले की, मुंबई नालेसफाई दौऱ्यामध्ये महापौर आणि उपमहापौर नक्की काय पाहतात? पाहणी दौरा करुण सुद्धा नाले तुंबतातच. आमची मागणी होती की तिथे सीसीटीव्ही लावा आणि घरातूनच ते पहावे, पाहणी दौऱ्यांची नाटकं करू नये त्याने काही फायदा होत नाही, केवळ बातम्या होतात.
