शहरातील विजेच्या समस्या सूक्ष्म नियोजन करून तातडीने सोडवाव्या:खा. बळवंत वानखडे यांची बैठकीत महावितरण आधिकाऱ्यांना सूचना‎

0
240_177807934269fb566e22236_balwantwankhad.jpg



शहरात दिवसेंदिवस विद्युत विषयक समस्या वाढत आहेत. ऐन उन्हाळ्यात शहरातील वडाळी , बुधवारा , बिच्चू टेकडी , जवाहर स्टेडियम , फ्रेजरपुरा , चपराशीपुरा , पश्चिम क्षेत्र या भागात वारंवार विद्युत पुरवठा खंडित होणे. रोहित्र ओव्हरलोड होणे , विद्युत दाब कमी जास्

.

उन्हाळ्याच्या दिवसांत विजेची मागणी वाढली असताना शहरात विद्युत विभागाच्या विविध विद्युत विषयक समस्या तसेच नागरिकांच्या तक्रारींत वाढ होत असून सातत्याने नागरिक नगरसेवक, काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडे तक्रारी घेऊन येत आहेत. या तक्रारींचे निवारण महावितरणच्या तक्रार निवारण केंद्रात होत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. याबाबत मनपा विरोधी पक्षनेते विलास इंगोले, नगरसेवक बबलू शेखावत यांच्याकडेही सर्वसामान्यांच्या तक्रारी येत आहेत. महावितरणच्या या आढावा बैठकीत खासदारांसह नगरसेवकांनीही अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. सर्वसामान्यांच्या समस्यांचे निराकरण होण्याच्या दृष्टीने विद्युत विभागाच्या तत्काळ कारवाई सुरू करण्यात यावी, असे निर्देशही देण्यात आले. शहरात एकूण तीन उपविभाग कार्यरत असून, शहरात एकूण २ लाख ६ हजार विद्युत ग्राहक आहेत. अंदाजे ३६ कोटीची वसुली वीज बिलांच्या माध्यमातून विभागास होते. परंतु, त्या तुलनेत विभागामार्फत कोणत्याच सुविधा ग्राहकांना उपलब्ध होत नाहीत.

यावर तातडीने कारवाई करून विद्युत विभागाच्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचे संपर्क क्रमांक वृत्तपत्रात द्यावे, सूक्ष्म नियोजन करून सर्व समस्या एक आठवड्यात सोडवाव्यात असे निर्देश खा.वानखडे यांनी दिले. बैठकीला विलास इंगोले , विरोधी पक्षनेता , मनपा, नगरसेवक मिलिंद चिमोटे ,बबलू शेखावत , तसेच अचर्ना आत्राम , फिरोज खान , संजय शिरभाते , सुरेश रतावा , मोहम्मद रेहान मोहम्मद यासीन,विक्की वानखडे , राजू भेले , नितीन काळे , जावेद साबीर , आदी उपस्थित होते. शहरात दिवसा तसेच रात्री मोठ्या प्रमाणात विजेची मागणी असून विद्युत विभागाच्या नियोजन शून्य कारभारामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्याचा फटका बसत आहे. शहरातील नागरिकांना अखंडित वीज देणे हे विद्युत विभागाची नैतिक जबाबदारी असताना बऱ्याच ठिकाणी अनेक तास वीज पुरवठा खंडित राहत आहे. याबाबत सर्वसामान्य नागरिक विद्युत विभागाच्या कर्मच्यार्याना जाब विचारायला गेल्यास त्यांना उलटसुलट उत्तरे देऊन त्यांच्या समस्यांचे निराकरण देखील करत नाही. यामुळे विद्युत विभागाबाबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. मनपातील काँग्रेस पक्षाच्या सर्व नगरसेवकांनी देखील त्यांच्या प्रभागातील नागरिकांच्या समस्यांची कैफियत त्यांनी मांडली.

अखंडित वीज पुरवठा करणे ही महावितरण कंपनीची नैतिक जबाबदारी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *