जिल्ह्याचे “चेरापुंजी’ अकोल्याच्या नशिबी यंदाही टँकर:पारनेरात सर्वाधिक तीव्रता, 70 हजार जनता तहानलेली; 41 गावे अन् 179 वाड्यांना 35 टँकरचा आधार‎

0
253_177807743669fb4efca2904_ppppp.jpg



जिल्ह्यात उन्हाचा कडाका वाढू लागताच पाणीटंचाईच्या झळा तीव्र होऊ लागल्या आहेत. बुधवारपर्यंत (६ मे) जिल्ह्यातील ४१ गावे आणि १७९ वाड्या-वस्त्यांवरील सुमारे ७० हजार नागरिकांना तहान भागवण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात एकूण ३

.

विशेष म्हणजे, ज्या अकोले तालुक्यात सरासरी ७०० मिमी पाऊस होतो, जिथून निळवंडे आणि भंडारदरा धरणांतून पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी दिले जाते, त्याच अकोले तालुक्याच्या नशिबी यंदाही टंचाईचे चटके आले आहेत. या तालुक्यात सध्या २ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. यंदा जिल्ह्यात सर्वाधिक टंचाई पारनेर तालुक्यात असून, येथील १३ गावे आणि ११३ वाड्या-वस्त्यांवरील ३१,४०८ नागरिक टँकरवर अवलंबून आहेत. तेथे १५ खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. बागायती भाग म्हणून ओळख असलेल्या संगमनेर तालुक्यातील १८ गावे आणि ३४ वाड्यांमध्ये १० शासकीय व २ खासगी अशा १२ टँकरद्वारे पाणी दिले जात आहे.

सर्वाधिक पाऊस होत असलेल्या अकोले तालुक्यातील ४ गावे आणि ११ वाड्यांमध्ये २ शासकीय टँकर सुरू असून, ११७१ नागरिकांची तहान भागवली जात आहे. तर अहिल्यानगर तालुक्यातील ६ गावे आणि २१ वाड्यांमध्ये ६ खासगी टँकरद्वारे ११,११० लोकसंख्येला पाणी पुरवले जात आहे. टँकर भरण्यासाठी आणि थेट पाणीपुरवठ्यासाठी प्रशासनाने जिल्ह्यात एकूण १२ खासगी विहिरी व बोअरवेल अधिग्रहित केल्या आहेत. यापैकी १० विहिरींचा वापर टँकर भरण्यासाठी, तर २ विहिरींचा वापर गावकऱ्यांना थेट पाणी देण्यासाठी केला जात आहे. कोपरगाव, श्रीरामपूर, राहुरी, नेवासे, राहाता या तालुक्यात सध्या टँकर सुरू नाहीत. मात्र, आश्चर्य म्हणजे कायम दुष्काळात होरपळणाऱ्या पाथर्डी, शेवगाव, कर्जत, जामखेड आणि श्रीगोंदे या तालुक्यांत सध्या एकही टँकर सुरू नसल्याची नोंद आहे. दहा वर्षांपूर्वी याच काळात या तालुक्यांत भीषण टंचाई होती.

गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठा दिलासा यंदा टंचाईची तीव्रता गेल्या वर्षीच्या तुलनेत खूपच कमी आहे. गेल्या वर्षी आजच्या तारखेला जिल्ह्यात १४२ टँकर धावत होते, त्या तुलनेत यंदा केवळ ३५ टँकरची गरज भासत आहे. प्रशासनाने दररोज सरासरी ९४ खेपांना मंजुरी दिली असून, त्यापैकी ९० खेपा (९५%) पूर्ण होत आहेत. गेल्या वर्षी याच काळात अकोल्यात ७, जामखेडमध्ये ६, अहिल्यानगरमध्ये १२ आणि नेवाशात २ टँकर सुरू होते.

जिल्ह्यातील १२ विहिरींचे अधिग्रहण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed