पर्वती प्रकरणातील मुलीच्या आईचा संताप:माझ्या मुलीच्या अंगावर हात टाकणाऱ्या माझ्या बापाला फाशी द्या; वडिलांचाही सासऱ्यावर संताप

0
copy-of-db-temp-photo-resize-marathi-2026-05-05t15_1778061523.png




पुण्याच्या पर्वती भागात एका 70 वर्षीय व्यक्तीने आपल्या नातीवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याची संतापजनक घटना घडली आहे. पीडित मुलीच्या आईने या प्रकरणी तीव्र संताप व्यक्त करत हा प्रकार करणाऱ्या आपल्या वडिलांना फासावर चढवण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे आरोपीला पीडित कुटुंबाने वर्षभरापूर्वीच चोरीच्या एका घटनेनंतर घरातून हाकलून लावले होते. पुण्याच्या नसरापूर येथील एका साडेतीन वर्षीय मुलीवरील अत्याचार व हत्या प्रकरणामुळे अवघ्या राज्यात खळबळ माजली आहे. त्यानंतर आज पुण्याच्याच पर्वती भागात एका व्यक्तीने आपल्या नातीवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आई-वडिलांनी ही घटना कशी उजेडात आली याची माहिती दिली आहे. पीडित मुलीने रात्री आईला सांगितला प्रकार पीडित मुलीची आई पत्रकारांशी बोलताना म्हणाली, आम्ही दोघेही दिवसभर कामासाठी घराबाहेर जातो. मी कपड्याच्या दुकानात काम करते, तर माझे पती रिक्षा चालवतात. मी रात्री 9 च्या सुमारास घरी आले असता मुलीने मला हा सगळा प्रकार सांगितला. मी घरी पोहोचले तेव्हा तिच्या अंगावर कपडे नव्हते. तिच्या अंगावर सर्वत्र नखांचे ओरखडे होते. माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. त्याला फाशी झाली पाहिजे. या प्रकरणी आम्ही पोलिसांना सहकार्य करत आहोत. यापूर्वीही एक असाच प्रकार घडला होता. पण तेव्हा ती गोष्ट आम्हाला माहिती नव्हती. माझ्या मुलीने सांगितले की, आजोबांनी यापूर्वीही माझ्यासोबत असा प्रकार केला होता. तुम्ही कामाला गेल्यानंतर तात्या मला ओढून आत नेण्याचा प्रयत्न केला. पण तेव्हा मी बाहेर पळून गेले. आता दुसऱ्यांदा लय मोठा किस्सा घडला. ही घटना मंगळवारी रात्री घडली. आम्ही पोलिसांकडे गेलो. त्यावर पोलिस म्हणाले की, आम्ही तुमच्यासोबत आहोत. लय कालवा करू नका. लोकांना काही सांगू नका. कुणी मोर्चा वगैरे काढला तर दगडफेक होईल, असे पीडित माता म्हणाली. पीडित मुलीचे वडील काय म्हणाले? मुलीच्या वडिलांनी यावेळी चोरीच्या एका प्रकरणात वर्षभरापूर्वीच आपल्या सासऱ्याला घराबाहेर काढल्याचे सांगितले. ते म्हणाले, मी रिक्षा चालवतो. मी कालही नेहमीप्रमाणे कामावर गेलो होतो. आमचा मुलगा घरात झोपला होता. हे सगळे सायंकाळी 7 वा. घडले. मुलीची आई रात्री 9 वा. कामावरून घरी आली. तेव्हा हा प्रकार समोर आला. वर्षभरापूर्वीच माझ्या सासऱ्याने माझा मोबाईल चोरला. तेव्हा मी त्यांना घरातून हाकलून लावले होते. या घटनेनंतर मी मी बायकोला विचारले होते, तुला बाप हवा की नवरा? तेव्हा तिने माझी निवड केली. नंतर माझ्या सासऱ्याने कुठे घर घेतले होते हे मला माहिती नाही. पण तो जवळपासच कुठेतरी राहतो हे आम्हाला माहिती नव्हते. काल त्यांनी माझ्या मुलीला खाऊ दिला. लहान मुलांना काही कळत नाही. त्यानंतर त्यांनी तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला, असे ते म्हणाले. हे ही वाचा… पुण्यात आजोबाकडून नातीवर अत्याचाराचा प्रयत्न:अकोल्यात 60 वर्षीय वृद्धाचा 10 वर्षांच्या मुलीवर बलात्कार; आरोपीचा शोध सुरू
पुण्याच्या भोर तालुक्यातील नसरापूर येथील चिमुकलीची घटना ताजी असतानाच, पुण्याच्या मध्यवर्ती पर्वती परिसरात एका ७० वर्षीय व्यक्तीने नात्याची सर्व मर्यादा ओलांडून आपल्या सख्ख्या नातीवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. अंबादास यल्लाप्पा जाधव (७०) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेजाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे या चिमुकलीची सुटका झाली असून एक मोठा अनर्थ टळला आहे. वाचा सविस्तर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed