लेबल प्रसिद्ध ब्रँडचे, आत ‘कास्टिक'चा खेळ:नया अकोल्यात तयार केले नकली साबण, डिटर्जंट पावडर, 72 लाखांचा माल जप्त, चौघांना अटक

0
dn69349108v-v53406_manual.png




आपल्या घरात वापरला जाणारा कपडे धुण्याचा साबण किंवा डिटर्जंट पावडर नामांकित कंपनीच्या पॅकींगमध्ये आहे म्हणून खरोखरच ओरिजनल आहे का, हा गंभीर प्रश्न आता निर्माण झाला आहे. कारण शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने नया अकोला परिसरात टाकलेल्या धाडीत नामांकित कंपन्यांच्या पॅकेजिंगमध्ये बनावट डिटर्जंट पावडर आणि साबण तयार करून विक्री करणारा मोठा गोरखधंदा उघडकीस आणला आहे. या कारवाईत तब्बल ७२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून चार जणांना पकडण्यात आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा गोरखधंदा कारखाना टाकून खुलेआम सुरू असूनही वलगाव पोलिसांना याची कानोकान खबर नव्हती. जुनेद खान यासीन खान (२८, रा. पाकीजा कॉलनी, अमरावती) याने हा कारखाना सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या कारखान्याचा मुळ मालक वेगळाच असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले असून पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू आहे. याचवेळी त्याच्यासोबत पोलिसांनी त्या ठिकाणी काम करणारे प्रफुल विष्णुपंत डोईफोडे (४८, न्यु म्हाडा कॉलनी, अकोली), शेख भुरू शेख मुनीर (५०, झोंडा चौक, अमरावती) आणि शेख कलीम शेख माजीद (४०, रा. बिस्मील्ला नगर, अमरावती) या तिघांनाही पकडले आहे. वलगाव पोलिस , उर्वरित पान.४ पॅकेजिंगचे बारकावे : मूळ कंपनीच्या पॅकेटवरची प्रिंटिंग अत्यंत स्पष्ट आणि उठावदार असते. बनावट पॅकेटवरील रंग थोडे फिके असू शकतात किंवा त्यावरील अक्षरे चुकीची असू शकतात. क्यूआर कोड : आजकाल अनेक ब्रँड्सवर क्यूआर कोड असतात. तो स्कॅन केल्यास कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर रिडायरेक्ट होते. बनावट मालावर असे कोड नसतात किंवा ते काम करत नाहीत. पॅकेटचे सीलिंग : मशीनने केलेले ओरिजिनल सीलिंग हे अगदी सरळ आणि नीटनेटके असते. हाताने किंवा स्थानिक मशीनने केलेले सीलिंग अनेकदा वाकडे-तिकडे किंवा खरबरीत असते. किंमत आणि सवलत : जर एखादा दुकानदार नामांकित ब्रँडवर ५०% पेक्षा जास्त सवलत देत असेल, तर सावध व्हा. नामांकित कंपन्यांची मार्जिन ठराविक असते, त्यामुळे अवाजवी सवलत हा बनावट मालाचा संकेत असू शकतो. कच्च्या मालापासून तयार करायचे नामांकित ब्रँडचे बनावट उत्पादने या कारखान्यात कास्टिक सोडा, वेगळ्या प्रकारचे मीठ, डोलोमाइट नावाचे रसायन आणि एक लिक्विड पदार्थांचा वापर करून डिटर्जंट पावडर आणि साबण तयार केले जात होते. तयार झालेल्या या बनावट उत्पादनांना नामांकित कंपन्यांच्या लेबल्सखाली याच कारखान्याम मशिन्सच्या मदतीने पॅक करून शहर व जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर विक्री केली जात होती. ब्रँडेड लेबल्समुळे ग्राहक कोणतीही शंका न घेता हे उत्पादने खरेदी करत होते. मात्र प्रत्यक्षात अमरावतीकरांची आर्थिक फसवणूक होत असल्याचे उघड झाले. सुमारे ४० टक्के नफा कमवायचे जुनेद खान आणि त्याचे सहकारी कच्चा माल वापरून बनावट डिटर्जंट पावडर व साबण तयार करत होते. या व्यवसायातून ते किमान ४० टक्क्यांहून अधिक नफा कमावत असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. कारण नामांकित कंपनीचे लेबल वापरून त्यावर मूळ कंपनीची एमआरपीच छापली जात होती आणि ग्राहकांना त्याच दराने हा बनावट माल विकला जात होता. दरम्यान हा बनावट माल आजवर कुठे आणि किती प्रमाणात विकला गेला, कोणाला पुरवठा करण्यात आला, किती नफा मिळवला आणि किती दिवसांपासून हा व्यवसाय सुरू होता, या मार्केटींग साखळीत कोण सहभागी आहे, याचा सखोल तपास पोलिस करणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *