Mandhardev Kalubai & Dhom Devsthan to Get B Class Status

0
db-temp-cover-marathi-2026-05-06t115033158_1778048504.jpg



सातारा जिल्ह्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वाई तालुक्यातील मांढरदेव येथील श्री काळूबाई देवस्थान आणि धोम येथील श्री नरसिंह सिद्धेश्वर देवस्थानच्या विकासासाठी राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. या दोन्ही देवस्थानांना ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्रा

.

वाई-खंडाळा-महाबळेश्वर परिसरातील युवा नेते विराज शिंदे आणि सातारा जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती ऋतुजा शिंदे यांनी या दोन्ही देवस्थानांच्या विकासासाठी ग्रामविकास मंत्र्यांकडे आग्रही मागणी केली होती. कोणत्याही भागाचा विकास करताना तेथील धार्मिक आणि सांस्कृतिक केंद्रे सक्षम असणे गरजेचे असते, हा विचार मांडत त्यांनी या मागणीचा प्रभावी पाठपुरावा केला.

विकासाला मिळणार मोठी गती

‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाल्यामुळे मांढरदेव आणि धोम परिसरात मूलभूत सुविधांचे जाळे निर्माण होणार आहे. दरवर्षी येथे येणाऱ्या लाखो भाविकांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र व्यवस्था, उत्तम रस्ते, पिण्याचे पाणी आणि भक्त निवासासारख्या पायाभूत सुविधांच्या विकासाला यामुळे वेग मिळणार आहे. तीर्थक्षेत्राचा विकास झाल्यामुळे पर्यटन वाढून पर्यायाने स्थानिक छोटे व्यावसायिक, दुकानदार आणि ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

प्रशासनाकडून ‘हिरवा कंदील’

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी या मागणीची गांभीर्याने दखल घेत ग्रामविकास विभागाच्या प्रधान सचिवांना तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. प्रशासकीय पातळीवर मिळालेल्या या सकारात्मक प्रतिसादामुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न आता सुटण्याच्या मार्गावर आहे. हा विकास केवळ सिमेंट-काँक्रीटपुरता मर्यादित न ठेवता देवस्थानांचे पावित्र्य आणि सांस्कृतिक वारसा जपत केला जाईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

या बैठकीप्रसंगी मांढरदेव पठारावरील ग्रामस्थ आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उप विभाग प्रमुख विजय मांढरे, वेरुळीचे माजी सरपंच जगन्नाथ मांढरे, एकनाथ मांढरे, अमित मांढरे, संतोष मांढरे, कार्तिक मांढरे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निर्णयामुळे वाई तालुक्यातील जनतेमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *