सिल्लोड आगारात व्यवस्थापक म्हणून स्वाती बाखडे यांनी स्वीकारला पदभार:कर्मचाऱ्यांकडून सत्कार, प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन‎

0
240_177797714269f9c736b00a5_silload1111.jpg




सिल्लोड आगाराच्या इतिहासात प्रथमच एका महिलेने व्यवस्थापक पदाची धुरा सांभाळली आहे. सोमवारी स्वाती घोडे-बाखडे यांनी आगार व्यवस्थापक म्हणून पदभार स्वीकारला. त्यांच्याकडे विभागाचा वाहतूक अधीक्षक या महत्वाच्या पदाचा कारभार आहे. त्यांच्या नियुक्तीने आगारातील महिला कर्मचाऱ्यांसह संपूर्ण कामगार वर्गात आनंदाचे वातावरण आहे. गेल्या महिन्यातील एका आकस्मिक घटनेनंतर आगारातील तीन महत्वाची पदे रिक्त झाली होती. यापूर्वी वाहतूक निरीक्षक म्हणून सतीश अंभोरे आगारात रुजू झाले आहेत. महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे प्रादेशिक सचिव बाबासाहेब साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली घोडे यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी वाहतूक निरीक्षक सतीश अंभोरे, सहाय्यक वाहतूक निरीक्षक पी. मगर,वाहतूक नियंत्रक अशोक काळे,सचिव संदिप इंगळे,वरिष्ठ लिपिक बाबुराव पंडित,बद्रीनाथ भालगडे,किरण अनवेकर,लिपिक रवींद्र डेरे,सी. टी बनसोड,विवेक व्यवहारे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. यावेळी बाखडे यांचा विविध विभागातील कर्मचाऱ्यांनी सत्कार केला. कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यास राहणार प्राधान्य कामगारांच्या प्रश्नांची जाण असलेल्या एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची विभागात ओळख आहे. आगारातील चालक, वाहक, ॲडमिन व यांत्रिक कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांचा त्यांनी आढावा घेत त्याचे लवकर च निपटारा करण्याचे आश्वासन संघटनेचे सचिव संदिप इंगळे यांना दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed