हरिनाम स्मरणातूनच जीवनाचे सार्थक:ठाणगावातील श्री स्वामी चरित्र संगीतमय चरित्रकथेत संतोष जाधव यांचे निरुपण‎

0
242_177799417969fa09c32f9b0_thangaonphoto1.jpg



एकच धर्म मानव धर्म आणि एकच जात मानव जात आहे. प्रत्येकाने आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडले, तर अधर्माला स्थानच उरणार नाही. आदर्श जीवन जगल्यास दु:ख कुणाच्याही वाट्याला येत नाही, असे प्रतिपादन संतोष जाधव यांनी केले. ठाणगाव (ता. सिन्नर) येथील श्री स्व

.

मराठी अस्मिता आणि हिंदू संस्कृती जपणे ही काळाची गरज असल्याचे सांगत त्यांनी कुटुंबव्यवस्थेतील बदलांवरही भाष्य केले. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार यामुळे माणूस आपल्या कर्तव्यापासून दूर जात आहे. प्रत्येकाने एखादा आदर्श समोर ठेवून जीवनाचे ध्येय निश्चित करणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. केंद्र संयोजक जयराम शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमासाठी सिन्नर तालुक्यासह अहमदनगर, पुणे व ठाणे जिल्ह्यातील भाविक उपस्थित होते. कार्यक्रमानंतर महाआरती व महाप्रसादाचे आयोजन केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed