नाशिक काॅर्पोरेट जिहाद:चारही संशयितांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, संशयित एचआर हेड अश्विनी चेनानी हिची जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव

0
orig_new-project-2026-04-21t072208270_1778029242.jpg




कॉर्पोरेट जिहाद प्रकरणातील चार संशयितांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. मंगळवारी संशयितांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयीन कोठडीची मागणी केली. संशयितांची रवानगी मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. याच गुन्ह्यात कारागृहात असलेली संशयित एचआर हेड अश्विनी चेनानी हिने उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे. मुंबई नाका पोलिस ठाण्यात दाखल बलात्कार, विनयभंग, धर्मांतर गुन्ह्यात अटक करण्यात आलेले संशयित तौसिफ बिलाल अत्तार, दानिश एजाज शेख, शाहरुख हुसेन शौकत कुरेशी, रझा रफिक मेमन या संशयितांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. संशयितांना सुरुवातीला २९ एप्रिलपर्यंत, त्यानंतर २ मे आणि पुन्हा ५ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. कोठडीत संशयितांनी अनेक धक्कादायक कृत्यांची कबुली दिली. निदा खान अद्याप फरारच या प्रकरणातील मुख्य संशयित आणि अटक झालेले संशयित व पीडित तरुणी यांच्यातील प्रमुख दुवा असलेली निदा खान अजूनही फरारच आहे. २ मे रोजी झालेल्या तिसऱ्या सुनावणीत कोर्टाने तिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर तिला केव्हाही अटक केली जाण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed