सीसीटीएनएस (CCTNS) रँकिंगमध्ये नांदेड जिल्हा पोलीस दल महाराष्ट्रात अव्वल; पटकावला प्रथम क्रमांक


अपर पोलीस महासंचालक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे यांच्याकडून दरमहा राज्यातील सर्व पोलीस घटकांच्या कामगिरीचा आढावा घेतला जातो. या आढाव्यात मार्च २०२६ मधील गुणांकनानुसार नांदेड जिल्ह्याची कामगिरी राज्यात सर्वोत्तम ठरली आहे.

अशी राहिली कामगिरी: नांदेड जिल्ह्यातील ३६ पोलीस ठाण्यांमार्फत भरण्यात येणारी माहिती, जसे की प्रथम खबर (FIR), घटनास्थळ पंचनामा, आरोपी अटक, मालमत्ता जप्ती, दोषारोप पत्र, न्यायालयीन निकाल, हरवलेले इसम आणि प्रतिबंधक कारवाई अशा एकूण १८ प्रकारच्या माहितीच्या नोंदी सीसीटीएनएस प्रणालीमध्ये अचूक आणि वेळेत करण्यात आल्या आहेत. तसेच, ITSSO, ICJS, Cri-MAC आणि Citizen Portal वरील ई-तक्रारींची (e-Complaint) वेळेत आणि प्रभावीपणे विल्हेवाट लावण्यात नांदेड पोलिसांनी यश मिळवले आहे.

यशाचे शिलेदार: पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली हे यश मिळाले असून, या कामगिरीत अपर पोलीस अधीक्षक  सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक (भोकर) श्रीमती अर्चना पाटील, सीसीटीएनएस नोडल अधिकारी, सहायक पोलीस निरीक्षक आदित्य लाकुळे, पोलीस उपनिरीक्षक सुमित बासंबेकर, पोलीस हवालदार समीरखान मुनीरखान पठाण आणि पोलीस कॉन्स्टेबल माधव नारायण येइलवाड यांचा मोलाचा वाटा आहे.

या अगोदर सुद्धा नांदेड जिल्हा पोलीस दलाने या कामगिरीत अनेकदा बक्षिसे मिळवलेली आहेत. या यशाबद्दल पोलीस अधीक्षक साहेबांनी सीसीटीएनएस विभागाचे विशेष कौतुक केले असून, भविष्यातही अशीच उत्कृष्ट कामगिरी करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. या यशामुळे संपूर्ण राज्यात नांदेड जिल्हा पोलीस दलाची मान उंचावली आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *