लाकूड बाजारात आग; सहा दुकानांतील साहित्य खाक:नियंत्रणासाठी 20 अग्निशमन बंबांची घ्यावी लागली मदत
![]()
परतवाडा शहरातील गजबजलेल्या लाकुड बाजार परिसरात रविवारी ३ मे रोजी रात्री ८.३० च्या सुमारास अचानक लागलेल्या भीषण आगीत सहा दुकाने जळून खाक झाली आहेत. टांगा चौक येथील लक्कड बाजारात बाळापुरे फर्निचर या दुकानात शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. ही आग परिसरात असलेल्या आदर्श प्लायवूड व इलियास ऑटो पार्टस व जुनेद यांच्या दुकानापर्यंत पोहोचली. या आगीत प्लायवूड फर्निचर साहित्य जळून खाक झाले. बाळापूरे फर्निचरच्या संचालकांना ते नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घराकडे परत जात असतांना अचानक दुकानात आग लागल्याचे त्यांना कळाले. या दरम्यान परिसरातील नागरिकांनी अचलपूर पालिकेच्या अग्निशमन विभागाला आग उर्वरित, पान.४ पालिकेत पाच अग्निशमन बंब,कामी आले केवळ दोन अचलपूर नगर पालिकेत तीन अग्निशमन बंबाच्या मोठ्या गाड्या तर दोन छोट्या गाड्या आहेत. आग लागली असता एका गाडीचे बेअरींग तुटल्याने ती नादुरुस्त होती तर एक वाहन बनवण्यासाठी पाठविण्यात आले होते. दोन छोटे बंब सुरू असतांनाही त्यातील एका वाहन तांत्रिकदृष्ट्या काम करत नव्हते.
