मातोश्रीबाहेर नितेश राणेंसाठी बॅनरबाजी:ठाकरेंच्या निवासस्थानासमोर राणेंचा 'हिंदू गब्बर' आणि 'वस्ताद' असा उल्लेख, राजकीय चर्चांना उधाण




भाजपचे नेते नितेश राणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मुंबईतील राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा मोठा ठिणगी पडली आहे. मुंबईतील कलानगर परिसरात, थेट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’ बंगल्याच्या बाहेरच राणे समर्थकांनी मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी केली आहे. या बॅनरवर नितेश राणे यांचा उल्लेख ‘हिंदू गब्बर’ आणि ‘वस्ताद’ असा करण्यात आला आहे. यामुळे ठाकरे आणि राणे समर्थकांमधील वाद पुन्हा एकदा विकोपाला जाण्याची चिन्हे आहेत. नितेश राणेंचा ‘हिंदू गब्बर’ आणि ‘वस्ताद’ असा उल्लेख! भाजप नेते नितेश राणे यांचा २३ जून रोजी वाढदिवस आहे. याच वाढदिवसाचे औचित्य साधून राणे समर्थकांनी थेट ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात घुसून ही बॅनरबाजी केली आहे. नितेश राणेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना लावण्यात आलेले हे फलक अत्यंत लक्षवेधी ठरत आहेत. यापूर्वी नितेश राणे यांच्या समर्थकांकडून त्यांचा ‘हिंदूरक्षक’ असा उल्लेख केला जात होता, मात्र आता ‘मातोश्री’च्या मुख्य रस्त्यावरच थेट ‘हिंदू गब्बर’ आणि ‘वस्ताद’ अशा जळजळीत पदव्या वापरून लावण्यात आलेले बॅनर्स ठाकरे गटाला थेट आव्हान देणारे मानले जात आहेत. राणे-ठाकरे कलगीतुरा आणखी रंगणार नितेश राणे आणि ठाकरे कुटुंबातील राजकीय वैर संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. अशातच उद्धव ठाकरेंच्या घराबाहेरच अशा पद्धतीची बॅनरबाजी करून राणे समर्थकांनी ठाकरे गटाच्या जखमेवर मीठ चोळल्याची चर्चा रंगली आहे. या बॅनरबाजीला आता ठाकरे गटाचे शिवसैनिक त्याच आक्रमकतेने उत्तर देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हे ही वाचा.. मान्सून 48 तासांत मुंबईत पोहोचणार: UPत मुसळधार पावसाने झाडे, खांब उन्मळून पडली; MPत वीज, पंजाबमध्ये झाड कोसळून 2 ठार
देशात 15 दिवसांपासून छत्तीसगड सीमेवर अडकलेला मान्सून सोमवारी पुढे सरकला. तो पश्चिम किनारपट्टीवर मुंबईपासून 20 किमी दूर असलेल्या अलिबागपर्यंत पोहोचला आहे. पुढील 24 ते 48 तासांत तो मुंबईत पोहोचू शकतो. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाब, हिमाचल प्रदेश, हरियाणा आणि दिल्लीमध्ये मान्सूनपूर्व पाऊस पडत आहे. मध्य प्रदेशातील 17 जिल्ह्यांमध्ये पाऊस झाला. छतरपूरमध्ये सोमवारी वीज कोसळून दोन मुली भाजल्या. दोघींना रुग्णालयात नेण्यात आले, जिथे एकीचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेशातील 6 शहरांमध्ये सोमवारी दुपारनंतर पाऊस झाला. बस्तीमध्ये वादळी वाऱ्यासह पावसामुळे झाडे आणि खांब उन्मळून पडले. एक झाड गाडीवर पडले. रस्त्यावर युनिपोल पडल्याने वाहतूक कोंडी झाली. सविस्तर वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *