महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त गुणवंत ५१ विद्यार्थ्यांचा केला सत्कार:पात्र विद्यार्थ्याला ४८ हजार रुपये स्कॉलरशिप

0
240_177771182769f5bad34c5bf_02graminakot.jpg




प्रतिनिधी |अकोट श्री भाऊसाहेब पोटे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय १ मे महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन उत्साहात पार पडला. राष्ट्रीय स्तरावरील आर्थिक दुर्बल घटकांसाठीच्या एन.एम.एम.एस च्या परीक्षेत श्री.भाऊसाहेब पोटे विद्यालयातून एकूण १३३ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते. यापैकी ५९ विद्यार्थी पास झाले. या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.शिष्यवृत्ती परीक्षा १७९ गुणांची राष्ट्रीयस्तरावर घेण्यात आली होती. या परीक्षेत पात्र विद्यार्थ्याला ४८ हजार रुपये स्कॉलरशिप मिळणार आहे. यापैकी २१ विद्यार्थी मेरिट लिस्टनुसार शिष्यवृत्तीस पात्र ठरले.कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शिरीष पोटे (अध्यक्ष छत्रपती शाहू शिक्षण संस्था) हे होते. प्रमुख अतिथी म्हणून सचिव प्रा.डॉ. मेघना पोटे, अकोला जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. रवींद्र भास्कर, प्राचार्य पी.बी. रावणकर, संचालक अमोल तळोकार, प्रा. संदीप बोबडे, पी.एम. गावंडे विचारपीठावर उपस्थित होती. याप्रसंगी अध्यक्ष व मान्यवर मंडळींच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. एन.एम. एम. एस परीक्षेत तन्वी गुजर हिने १३८ गुण घेऊन इतर मागास प्रवर्गातून जिल्ह्यातून दुसरा क्रमांक पटकावला.मनस्वी कातखेडे हिने १०४ गुण घेऊन भटकी जमात या प्रवर्गातून प्रथम येण्याचा मान पटकावला. तर सोहम वायरे याने ९४ गुण मिळवून विशेष मागास प्रवर्गातून जिल्ह्यातून प्रथम स्थान मिळवले. जिल्ह्यातून प्रथम येणाऱ्या विद्यार्थिनीला प्रा. संदीप बोबडे यांनी ५००१ रुपयाचे रोख बक्षीस प्रदान केले. सूत्रसंचालन पर्यवेक्षक पी.एम. गावंडे यांनी केले तर आभार शिक्षक कन्हैया गौर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *