वेरूळ लेणीत मधमाशांचा पर्यटकांवर हल्ला:50 ते 100 जण किरकोळ जखमी, पर्यटकांना बाहेर काढताना मोठी तारांबळ; दोन तास लेणी बंद

0
ezgifcom-animated-gif-maker-3_1777797826.gif




जागतिक वारसा स्थळ असलेल्या व जगप्रसिद्ध वेरूळ लेणी परिसरात दिनांक 3 मे रोजी रविवारी सकाळी मधमाशांनी पर्यटकांवर अचानक हल्ला केल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेत 50 ते 100 पर्यटकांना किरकोळ डंख लागले असून सुदैवाने कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. रविवार असल्याने वेरूळ लेणी पाहण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली होती. सकाळी 10 ते 11 च्या सुमारास लेणी क्रमांक 10 व 16 पाहण्यासाठी पर्यटक पोहोचले असता, त्याचवेळी मधमाशांच्या थव्याने अचानक हल्ला चढवला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे पर्यटकांमध्ये घबराट पसरली. लहान मुले व वृद्ध पर्यटकांना बाहेर काढताना मोठी तारांबळ उडाली. स्थानिक गाईड, हॉकर्स व लेणी सुरक्षा रक्षकांनी तातडीने मदत करत सर्व पर्यटकांना सुरक्षित ठिकाणी बाहेर काढले. दोन तास लेणी बंद मधमाशांच्या या हल्ल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय पुरातत्व विभागाने वेरूळ लेणी पर्यटकांसाठी सुमारे दोन तास बंद ठेवल्या. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर लेणी पुन्हा सुरू करण्यात आली. वर्षभरानंतर पुनरावृत्ती यापूर्वी लेणी क्रमांक 16 मध्ये मधमाशांचे पोळे होते. विभागाने ते काढून टाकल्याने हल्ल्यांचे प्रमाण थांबले होते. मात्र वर्षभरानंतर आज पुन्हा लेणी क्रमांक 16 व लेणी क्रमांक 10 जवळ हल्ला झाल्याने चिंता व्यक्त होत आहे. वेरूळ लेणीतील 34 लेण्यांपैकी अनेक ठिकाणी आजही आग्या मोहळाचे पोळे आहेत. इतिहासाची पुनरावृत्ती 10 वर्षांपूर्वी लेणी क्रमांक 29 व 16 मध्ये अशाच मधमाशांच्या हल्ल्यात 50 ते 100 विदेशी पर्यटक जखमी झाले होते. 2007 मध्येही अशीच घटना घडली होती. अलीकडेच अजिंठा लेणीतही दोन महिन्यात 5 वेळा मधमाशांचे हल्ले होऊन 11 पर्यटक जखमी झाले आहेत. लेणी परिसरातील पोळे वेळोवेळी हटवावीत अशा हल्ल्यांपासून बचावासाठी लेणी परिसरातील मधमाशांची पोळी वेळोवेळी तपासून हटवावीत. तसेच आपत्कालीन परिस्थितीसाठी प्रथमोपचार पथक, धूर फवारणी यंत्रणा व सूचना फलक लावावेत, अशी मागणी पर्यटकांनी केली आहे. सध्या उन्हाळ्याच्या सुट्टी मुळे पर्यटकांची संख्या वाढली असून प्रशासनाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे. पुरातत्व विभागाचे अधिकारी काय म्हणाले? पुरातत्व विभागाचे वेरूळ लेणी प्रमुख अधिकारी निलेश कोळी यांनी सांगितले, “सध्या उन्हाळा असल्याने मधमाशा येथे पुन्हा पोळी बनवत आहेत. यापूर्वी मधमाशांची पोळी हटवण्यात आली होती, परंतु त्यांनी पुन्हा घरटी बनवली आहेत. तज्ज्ञांच्या मदतीने ही पोळी पुन्हा हटवण्यात येतील. पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी कायमस्वरूपी उपाययोजना राबवण्यात येणार आहेत.” पर्यटकांनी घ्यावयाची काळजी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *