Nasrapur Minor Rape Murder Accused Gets Police Custody Till May 7

0
db-temp-cover-marathi-2026-05-03t153727238_1777802897.jpg



भोर तालुक्यातील नसरापूर येथील चार वर्षांच्या चिमुकलीवर पाशवी अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या नराधम आरोपीला पुणे न्यायालयाने ७ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. विशेष न्यायाधीश एम. जी. चव्हाण यांच्यासमोर ही सुनावणी पार पडली. सुनावणी दरम्यान

.

पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायाधीशांनी त्याला “काही तक्रार आहे का?” अशी विचारणा केली. त्यावर आरोपीने अत्यंत निर्लज्जपणे उत्तर देत म्हटले की, “किरकोळ भांडणातून मला या प्रकरणात विनाकारण गोवण्यात आले आहे.” आपल्या कृत्याचा कोणताही पश्चात्ताप त्याच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता. मात्र, तपासातील निष्पन्न तथ्ये आणि चिमुकलीचा मृतदेह ज्या अवस्थेत सापडला, त्यावरून त्याचा हा बनाव न्यायालयात टिकू शकला नाही.

तपास यंत्रणेचा कडक युक्तीवाद

तपास अधिकारी विजयमाला पवार आणि विशेष सरकारी वकील अरुंधती ब्रह्मे यांनी आरोपीच्या जास्तीत जास्त पोलिस कोठडीची मागणी करताना अनेक महत्त्वाचे मुद्दे न्यायालयासमोर मांडले. आरोपीने चिमुकलीवर अत्याचार केल्याचे सिद्ध करण्यासाठी त्याची वैद्यकीय आणि रासायनिक विश्लेषण तपासणी करणे आवश्यक आहे. आरोपीची शारीरिक क्षमता तपासणे तपासाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.आरोपीने यापूर्वी अशा प्रकारचे कृत्य केले आहे का किंवा पीडितेवर याआधीही अत्याचार झाले होते का, याचा शोध घ्यायचा आहे. ज्या शस्त्राने चिमुकलीची निर्घृण हत्या केली, ते शस्त्र अद्याप जप्त करायचे आहे. या गुन्ह्यात आरोपीला इतर कोणी मदत केली आहे का किंवा यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याची सखोल चौकशी करणे गरजेचे आहे.

७ मे पर्यंत कोठडीत चौकशी

दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून आरोपीला ७ मे पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या काळात पोलिस आरोपीकडून हत्येचा घटनाक्रम आणि पुराव्यांची साखळी जोडण्याचा प्रयत्न करणार आहेत.

हे ही वाचा… माझ्या मुलीला न्याय मिळेपर्यंत सांत्वनासाठी येऊ नये:नसरापूरच्या पीडितेच्या वडिलांचे राजकारण्यांना आवाहन; नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी

नसरापूर येथील माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. विविध राजकीय पक्षांचे नेते आणि पदाधिकारी पीडित कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी नसरापूरला धाव घेत आहेत. मात्र, “जोपर्यंत माझ्या चिमुकलीला न्याय मिळत नाही आणि त्या नराधमाला फाशी होत नाही, तोपर्यंत कोणत्याही राजकीय नेत्याने आमच्या घरी येऊ नये,” असे कळकळीचे आवाहन पीडितेच्या वडिलांनी केले आहे. देहू येथे लेकीच्या आस्थी विसर्जनासाठी गेले असताना त्यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून आपली ही भूमिका स्पष्ट केली आहे. सविस्तर वाचा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed