मोदींचं 'सब कुछ ठीक' केवळ निवडणुकीपुरतं, नंतर महागाईचा भडका उडणार:कोरोना काळात जनतेला घरात ठेवणं गरजेचं होतं म्हणून उद्धव ठाकरे घरात होते- संजय राऊत

0
new-project-2026-05-02t102926174_1777698268.jpg




येणाऱ्या काळात प्रवास महागणार आहे. ज्या प्रवासासाठी इंधनाची गरज आहे, तो प्रवास महागणार आहे. मोदी म्हणतात सब कुछ ठीक है पण ते केवळ पश्चिम बंगालाच्या निवडणुकीपुरते ठीक होते त्यानंतर असे काही ठीक राहणार नाही, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत म्हणाले की, कोरोना काळात जर मुख्यमंत्री बाहेर पडले असते तर जनता बाहेर पडली असती. त्यावेळी जनतेला घरात ठेवणं गरजेचे होते ते काम महाराष्ट्र सरकारने केले होते. हे यांना कळते का? असा सवाल राऊतांनी भाजपला केला आहे. म्हणून ते उद्धव ठाकरे कोरोना काळात बाहेर पडले नाही असे बोलतात. ममता बॅनर्जी सत्तेत येतील संजय राऊत म्हणाले की, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी या पुन्हा सत्तेत येतील त्यांना जवळपास 180 ते 185 जागा मिळतील. ममता बॅनर्जी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी ज्या प्रकारे काम केले आहे त्यांचेच सरकार येणार असे मला वाटते आहे. अमित शहा यांना कोणताही आत्मविश्वास असू शकतो. खोटेपणाचा कळस गाठला की आत्मविश्वास वाढतो. कोणाचे पैसे उडवत आहात? संजय राऊत म्हणाले की, ग्रीन झोन जमीनी गौतम अदानीला द्यायच्या आणि आता ग्रीन झोनसाठी नवीन जमीनी ताब्यात घ्यायच्या हे काम सरकारचे सुरू आहे हा काय प्रकार आहे? तुम्ही कोणाचे पैसे उडवत आहात. हा सर्व नालायक प्रकार आहे. हुतात्मा स्मारकाचे काम करावे
संजय राऊत म्हणाले की, हुतात्मा स्मारकाची अवस्था जाऊन बघितली पाहिजे. सरकारचे त्याकडे लक्ष नाही. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मी काल एकच भूमिका मांडली. सरकारने किमान स्मारकाकडे तरी लक्ष दिले पाहिजे, अशी आमची मागणी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed