आत्मज्ञान हेच जीवनातील खरे ज्ञान- डॉ. सी. बी. कुलकर्णी:सावेडी ज्येष्ठ नागरिक मंचातर्फे डॉ. कुलकर्णी यांना पुरस्कार
![]()
मनुष्य जन्म हा दुर्लभ आहे. म्हणूनच या जन्मात आपला उद्धार करून घेतला पाहिजे. माझ्या या मानव जन्माचे प्रयोजन काय याचा विवेक बुद्धीने प्रत्येकाने विचार करावा, असे प्रतिपादन डॉ. सी. बी. कुलकर्णी यांनी केले. सावेडी ज्येष्ठ नागरिक मंचातर्फे यंदाच्या वर्षी ज्ञानविज्ञान पुरस्कार डॉ. चिंतामण भालचंद्र कुलकर्णी यांना प्रदान करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी डॉ. गौरी कुलकर्णी, कुमुदिनी बोपर्डीकर, लिलाताई गोविलकर, मंदा सोमणी, शोभा ढेपे, अँड. नीलिमा औटी, निरंजना देशमुख, सर्वोत्तम क्षीरसागर, अॅड. मनोहर केसकर आदी उपस्थित होते. ते पुढे म्हणाले, आपण जे ज्ञान मिळवतो ते आपल्या उदर भरणासाठी असते. अनेक जण अनेक क्षेत्रात ज्ञानी झालेले आपण पाहतो. पण हे झाले व्यावहारिक ज्ञान पण खरे ज्ञान हे समर्थ सांगतात तसे आत्मज्ञान आहे. त्यासाठी प्रत्येकाला जीवनात सद्गुरूंची आवश्यकता असते. त्यांनी दिलेला अनुग्रह आनंदाने स्वीकारला पाहिजे. अध्यक्ष शरद कुलकर्णी यांनी सर्वांची स्वागत व प्रास्ताविक केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय सचिव ज्योती केसकर यांनी करुन केला. कार्यक्रमाचे सूत्रसंाचलन निवेदिका भारती कुलकर्णी यांनी केले. तर आभार बाजीराव जाधव यांनी मानले.
