पिंपरी निर्मळ शिवारात गर्भलिंग निदानाचा अड्डा‎:डॉक्टर, एजंट अन् गर्भवतींचे पती पोलिसांच्या जाळ्यात; गर्भलिंग निदानप्रकरणी नऊ जणांवर केली कारवाई‎

0
253_177755962969f3684d8d44b_nirmalpimpri.jpg



राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ शिवारात, निळवंडे कालव्याजवळील एका निर्जन फार्महाऊसमध्ये सुरू असलेल्या बेकायदा गर्भलिंग निदान केंद्रावर पोलिसांनी छापा टाकून मोठ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय आणि लोणी पोलिसांनी स

.

यावेळी घटनास्थळी बीएएमएस डॉक्टर राहुल आबासाहेब भनगे (३४, रा. भानसहिवरे, ता. नेवासा) आणि एजंट तसेच जे.एन.एम नर्सिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला अभिजीत दिलीप भुसाळ (३०, रा. पिंपरी निर्मळ) हे दोघे आढळून आले. तपासात असे समोर आले की, आरोपींनी विनानोंदणीकृत पोर्टेबल सोनोग्राफी मशीनचा वापर करून कोणताही अधिकृत परवाना नसताना हा व्यवसाय थाटला होता. ग्रामीण रुग्णालय लोणीच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. स्वाती पवार यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

डॉक्टरसह नऊ जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली आहे. सर्व आरोपींना राहाता न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, पोलिसांनी या कारवाईत ५९ हजार रुपये रोख, ४ मोबाईल, पोर्टेबल सोनोग्राफी मशीन, आणि स्विफ्ट, वॅगनआर व आणखी एक कार अशी एकूण तीन वाहने जप्त केली आहेत.

जप्त केलेल्या एकूण मुद्देमालाची किंमत २४ लाख ९ हजार १०० रुपये आहे. खासगी वाहनाने सर्वांना आणले फार्महाऊसवर या कारवाईत बीड, संगमनेर, नाशिक, नांदगाव आणि पुणे अशा विविध जिल्ह्यांतून महिला येथे आल्या होत्या. कारवाईवेळी ८ गरोदर महिला आढळल्या. एजंटमार्फत त्यांना बाभळेश्वर येथून खासगी वाहनांनी या निर्जन फार्महाऊसवर आणले होते. पोलिसांनी या सर्व महिलांची लोणी येथील प्रवरा मेडिकल ट्रस्ट रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली असता, त्या ३ ते ४ महिन्यांच्या गरोदर असल्याचे निष्पन्न झाले आहे.

ओसाड फार्महाऊसमध्ये‎ गर्भलिंग तपासणीचा अड्डा‎

नवनाथ दिघे | निर्मळ पिंपरी सात लोकसंख्येच्या निर्मळपिंपरी गावाच्या हद्दीत निळवंडे कालव्याच्या कडेला असलेले ते फार्महाऊस पाहिल्यावर पहिल्याच नजरेत संशयास्पद जागेची जाणीव होते. निर्मळपिंपरी व लोणी खुर्दपासून सुमारे ३ किमीवर आणि लोणी–निर्मळपिंपरी रस्त्यापासून अर्धा किलोमीटर आत असलेल्या या ठिकाणी सहज कोणाचेही लक्ष जाणार नाही, अशीच त्याची रचना आहे. लोणी-निर्मळपिंपरी रस्त्यापासून अर्धा किलोमीटर आत आणि झुडपांच्या आडोशाला असलेल्या या जागेची निवड चाणाक्षपणे केली होती. सभोवताली शेती आणि तुरळक वस्ती असल्याने येथे कोण येते आणि जाते, हे कोणालाही कळणे कठीण होते. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, हे फार्महाऊस अनेक दिवसांपासून बाहेरून बंदच असायचे. मालक लोणीत वास्तव्यास असल्याने आणि हे बांधकाम फळबाग योजनेतून उभारलेले असल्याने कोणी विशेष शंका घेतली नाही.

असा सुरू होता प्रकार फार्महाऊसमध्ये बाहेरून कुलूप लावून आत तपासणीची व्यवस्था केली जायची, जेणेकरून कोणालाही संशय येऊ नये. महिलांना थेट खाजगी वाहनातून या ठिकाणी आणले जात असे. या केंद्राचे वैशिष्ट्य म्हणजे येथे बॅटरीवर चालणाऱ्या यंत्रणेचा वापर केला जात होता, ज्यामुळे वीजपुरवठ्याशिवायही तपासणी करणे शक्य होते. परिसरातील शांतता आणि वस्तीचा अभाव यामुळे हालचालींकडे कोणाचे लक्ष जात नव्हते.

मोठे रॅकेट असण्याची शक्यता केवळ डॉक्टर आणि एजंटच नव्हे, तर गर्भलिंग निदानासाठी पत्नीला सोबत घेऊन आलेल्या पतींना आणि इतर नातेवाईकांनाही पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे. या रॅकेटमध्ये आणखी कोणाचे हात गुंतले आहेत आणि हे मशीन कोठून खरेदी केले, याचा तपास लोणी पोलिस करत आहेत. दहा हजारांत गर्भलिंग निदान पिंपरी निर्मळ शिवारात सुरू असलेल्या या बेकायदा केंद्रावर प्रत्येक महिलेकडून गर्भलिंग निदानासाठी १० हजार रुपये आकारले जात होते. अव्वाच्या सव्वा पैसे घेऊन हा काळाबाजार सुरू होता. मुख्य आरोपी डॉ. राहुल भनगे याने आर्थिक फायद्यासाठी विनानोंदणीकृत पोर्टेबल मशीनच्या साह्याने हा अड्डा थाटला होता, जिथे केवळ पैशांसाठी नियमांची पायमल्ली केली जात होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed