![]()
पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या पैठणकरांना अखेर सोमवारी मान्सूनने दिलासा दिला. दुपारी चारच्या सुमारास वातावरणात अचानक बदल होऊन काळ्या ढगांनी आकाश व्यापले आणि काही क्षणांतच वादळी वाऱ्यासह मान्सूनच्या पहिल्या दमदार सरींनी शहराला झोडपून काढले. यंदाच्या हंगामातील हा पहिलाच मान्सून पाऊस असल्याने नागरिकांसह शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले, या वादळी वार्यासह झालेल्या पावसाने पंचायत समितीच्या समोर एक झाड,व कहारवाडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या जवळिल वडाचे झाडे या वादळी वार्याने पडले असुन ,एसटी बस स्थानक समोर पाणीच पाणी झाले,मान्सून मधील पहिला पाऊस झाल्याने अनेकांनी या पावसात भिजण्याचा आनंद देखील घेतला तर ग्रामीण भागातील जायकवाडी, पिंपळवाडी, कारखाना या परिसरात पाच मिनिटे रिमझिम पाऊस झाला. जुन च्या शेवटचा आठवडा असताना देखील गेल्या काही दिवसांपासून तीव्र उकाडा आणि वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले होते. सोमवारी दुपारनंतर अचानक विजेच्या कडकडात सह वाऱ्यात सुरू झालेल्या पावसाने शहरातील प्रमुख रस्ते, चौक आणि सखल भाग काही काळ पाण्याखाली गेले. पावसाच्या आगमनामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून उष्णतेपासून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. खरीप हंगामाच्या तोंडावर पावसाने दिलेली ही हजेरी शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण ठरली आहे. पावसाअभावी शेतकरी चिंतेत होते. पहिल्या दमदार सरींमुळे जमिनीत आवश्यक ओलावा निर्माण होणार असून पेरणीच्या कामांना गती मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाने समाधान व्यक्त केले. दरम्यान, जायकवाडी धरण परिसरात रिमझिम पावसासोबत विजांचा कडकडाटही झाला,यात पहिल्या पावसाने विज पुरवठा शहरा सह ग्रामीण चा बंद झाला यामुळे महावितरण चा भोंगळ कारभार पुन्हा समोर आला असुन मान्सून पुर्व कोणत्या ठिकाणी महावितरण ने झाडे तोडली कोठे कामे केली हा संशोधनाचा विषय झाला आहे. शहरात पाऊस ग्रामीण मध्ये उकडा आज शहरात वीस मिनिटे पाऊस झाला तर ग्रामीण भागात मात्र ढगाळ वातावरणात विजेचा कडकडाट झाला यामुळे वातावरणात प्रचंड उकडा निर्माण झाला.
पैठणमध्ये मान्सूनची दमदार 'एन्ट्री':वादळी वाऱ्यासह पहिल्याच पावसाने शहराला झोडपले!
